'रात्रीस खेळ चाले ३' ही मालिका सध्या प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेच्या आधीच्या दोन्ही भागांनी चाहत्यांना खिळवून ठेवलं होतं. मालिकेच्या दोन्ही भागांना मिळालेल्या अफाट यशानंतर मालिकेचा तिसरा भागसुद्धा आपल्या भेटीला आला आहे. कोरोना काळात शूटिंगला बंदी असल्याने, या मालिकेचं शूटिंगदेखील बंद ठेवण्यात आलं होतं. मात्र आत्ता पुन्हा एकदा मालिका नव्या भागांसह आपल्या भेटीला आली आहे. (हे वाचा:'एकदंताय वक्रतुण्डाय...' खास अंदाजात शालूने लाडक्या बाप्पाला केलं वंदन) नुकताच मालिकेचं नवा प्रोमो समोर आला आहे. यानुसार 'रात्रीस खेळ चाले ३'मालिकेमध्ये नायकांच्या वाड्यात गणपती बाप्पाची स्थापना करण्यात आली आहे. नाईक वाडा विकायचा असं सर्वांनी ठरवलं आहे. त्यामुळे ही वाड्यातील शेवटची गणेश चतुर्थी मोठ्या उत्साहाने आणि सर्वांच्या उपस्थितीत करावी असं अभिरामच मत असतं. त्यानुसार वाड्यात गणराया विराजमान झाले आहेत. (हे वाचा:Ganesh Chaturthi 2021:अभिनेता सुव्रत जोशीने बनवले बाप्पाचे आवडते मोदक) मात्र दुसरीकडे शेवंताची मुलगी सुशल्या अजूनही वाड्यातील सर्वांवर राग ठेवून आहे. त्यामुळेच ती आपल्या पतीसोबत मिळून दत्ताला दारू पाजते. दत्ता इतकी दारू पितो, की त्याला स्वतः चा तोलही सावरणं कठीण होतं, अशाच अवस्थेत तो बाप्पाच्या आरतीसाठी वाड्यावर पोहोचतो आणि धिंगाणा घालू लागतो. हे सर्व पाहून अभिराम कोणता निर्णय घेणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.