मुंबई, 11 सप्टेंबर- गणपती बाप्पाला बुद्धी,सुख आणि समृद्धीचा देवता समजलं जातं. तब्बल १० दिवस गणरायाची अगदी भक्तिभावाने पूजा केली जाते. कालपासून गणेशोत्सवाला**(Ganesh Chaturthi 2021)** सुरुवात झाली आहे. जो तो भक्त बाप्पाच्या सेवेत लागला आहे. मग ते सजावट असो आरती असो किंवा प्रसाद सर्व भक्त आपल्या हाताने बाप्पाची सेवा करत आहेत. अभिनेता सुव्रत जोशीने**(Suvrat Joshi)** चक्क स्वतःच्या हाताने उकडीचे मोदक बनवत गणरायाला खुश केलं आहे.
कालपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. काल अगदी थाटामाटात गणराया आपल्या घरी विराजमान झाला आहे. वातावरण अगदी भक्तिमय झालं आहे. बाप्पाला खुश करण्यामध्ये आपले लाडके कलाकारसुद्धा मागे नाहीत. अभिनेता सुव्रत जोशीने नुकताच आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेयर केला आहे. (हे वाचा: अभिज्ञा भावेच्या घरी आले विठ्ठलरुपी बाप्पा; आकर्षक सजावटीने वेधलं लक्ष ) यामध्ये अभिनेता चक्क आपल्या हाताने मोदक बनवत असल्याचं दिसत आहे.बाप्पाला नेहमीच पंचपक्वानांचा भोग लावला जातो. मात्र बाप्पाचं आवडता पदार्थ म्हणजे मोदक होय. असं म्हटलं जातं की बाप्पाला मोदक खूपच प्रिय आहे. त्यामुळे सर्वात आधी बाप्पाला मोदकाचा प्रसाद दाखवतात. सुव्रत या व्हिडीओमध्ये आपल्या हाताने सुंदर असे मोदक तयार करत आहे. एखाद्या स्त्रीलासुद्धा थक्क करतील इतके सुंदर मोदक या अभिनेत्याने बनवले आहेत. (हे वाचा: सुखकर्ता, दुःखहर्ता…’ रितेशच्या मुलांनी गोड गळ्यात गायिली बाप्पाची आरती ) सुव्रतचा मोदक बनवतानाचा व्हडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्ससुद्धा मिळत आहेत. चाहते कमेंट्स करून सुव्रतच्या या पाककलेचं कौतुक करत आहेत. तसेच अभिनेत्याने सर्वांना गणेशोत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छादेखील दिल्या आहेत.