Home /News /entertainment /

'एकदंताय वक्रतुण्डाय...' खास अंदाजात शालूने लाडक्या बाप्पाला केलं वंदन

'एकदंताय वक्रतुण्डाय...' खास अंदाजात शालूने लाडक्या बाप्पाला केलं वंदन

'फॅन्ड्री' या चित्रपटामुळे शालूच्या रूपात ही अभिनेत्री घराघरात पोहोचली आहे.

  मुंबई, 11 सप्टेंबर- गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi 2021) हा एक आनंदाचा सोहळा असतो. लंबोदराच्या येण्याने वातावरणात सकारत्मकता दिसून येते. बाप्पाच्या गाण्यांची तर गोष्टच न्यारी आहे. बाप्पाची गाणी कानावर पडताच पाय आपोआप थिरकू लागतात. अंगात एक उत्साह संचारतो. आपल्या सर्वांची लाडकी शालू (Shalu) अर्थातच अभिनेत्री राजेश्वरी खरातने(Rajeshwari Kharat) 'एकदंताय वक्रतुण्डाय' या गाण्यावर सुंदर नृत्य करत बाप्पाला वंदन केलं आहे.
  गेली दीड वर्षे सर्वांसाठीच फार कठीण होती. कोरोना महामारीमुळे लोकांचे अतोनात हाल झाले आहेत. अनेकांचं आयुष्य दुःख आणि अडचणींनी भरून गेलं होता. त्यामुळे वातावरणात एक नाकारत्मकता पसरली होती. मात्र आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाने सर्वांमध्ये एक नवचैतन्य संचारलं आहे. प्रत्येकाच्या अंगात बळ आलं आहे. म्हणूनच वातावरण अगदी सकारात्मक बनून गेलं आहे. जो-तो गणरायाच्या भक्तीत तल्लीन झाला आहे. (हे वाचा:श्रेया बुगडेने शेयर केले बाप्पासोबतचे सुंदर PHOTO; म्हणाली वर्षभर....) काल आपल्या घरी बाप्पा विराजमान झाला. प्रत्येक भक्त आपल्या कलेच्या माध्यमातून बाप्पाला वंदन करत आहे. 'फॅन्ड्री' फेम शालू अर्थातच अभिनेत्री राजेश्वरी खरातनेसुद्धा बाप्पाला सुंदर असं वंदन केलं आहे. राजेश्वरीने नुकताच आपल्या इन्स्टाग्रामवर आपला एक व्हिडीओ शेयर केला आहे. यामध्ये ती गणरायाच्या येण्याच्या आनंदात नृत्य करत आहे. राजेश्वरीने 'एकदंताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय...' या बाप्पाच्या रोमहर्षक गाण्यावर सुंदर असं नृत्य करत बाप्पाला वंदन केलं आहे. (हे वाचा:OMG! या तर दीपिका, कतरिना आणि सोफी; VIRAL थ्रोबॅक फोटो पाहून सर्वच थक्क) 'फॅन्ड्री' या चित्रपटामुळे शालूच्या रूपात ही अभिनेत्री घराघरात पोहोचली आहे. या चित्रपटात अगदी साधीभोळी दिसणारी शालू आपल्या रियल लाईफमध्ये अतिशय मॉडर्न आणि ऍक्टिव्ह आहे. ती सोशल मीडियावरदेखील प्रचंड सक्रिय असते. सतत आपले फोटो आणि डान्स व्हिडीओ शेयर करून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. चाहतेही त्याच्या प्रत्येक पोस्टला भरभरून प्रेम देत असतात.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Ganesh chaturthi, Marathi entertainment

  पुढील बातम्या