मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

दीपिकाचं आपल्या बॉडीगार्डसोबत आहे खास नातं; त्याचा पगार ऐकून व्हाल हैराण

दीपिकाचं आपल्या बॉडीगार्डसोबत आहे खास नातं; त्याचा पगार ऐकून व्हाल हैराण

गेल्या अनेक वर्षांपासून जलाल दीपिकाबरोबर काम करत असून तो तिच्या सर्वात खास लोकांपैकी एक आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून जलाल दीपिकाबरोबर काम करत असून तो तिच्या सर्वात खास लोकांपैकी एक आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून जलाल दीपिकाबरोबर काम करत असून तो तिच्या सर्वात खास लोकांपैकी एक आहे.

मुंबई 9 ऑगस्ट: बॉलिवूडचे स्टार्स (Bollywood Stars) आणि त्यांचे बॉडीगार्ड्स (Body Guards) यांच्याबद्दल अनेक किस्से, कहाण्या प्रसिद्ध होत असतात. बॉलिवूड स्टार्सप्रमाणे काही त्यांचे बॉडीगार्ड्सही प्रसिद्ध झाले आहेत. लोकांनाही स्टार्स आणि त्यांचे बॉडीगार्ड्स यांच्याविषयी प्रचंड कुतूहल असते. कोणत्या स्टारचा बॉडीगार्ड कोण आहे?त्याला पगार किती मिळतो, स्टार आणि बॉडीगार्ड यांच्यातील नातं कसं आहे? अशा अनेक बाबी चर्चेचा विषय असतात. बॉलिवूड स्टार सलमान खानचा (Salman khan) बॉडीगार्ड शेराबाबत (Shera) नेहमी चर्चा होत असते. शेरा सलमानच्या सावलीप्रमाणे त्याच्यासोबत असतो, तसेच सलमानही शेराला त्याच्या भावाप्रमाणे वागवतो. अशीच चर्चा बॉलिवूड स्टार दीपिका पदुकोणचा (Deepika Padukone) बॉडीगार्ड जलाल (Jalal) याच्याबद्दल होत असते. झी न्यूज इंडिया डॉट कॉमनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून जलाल दीपिकाबरोबर काम करत असून तो तिच्या सर्वात खास लोकांपैकी एक आहे. जलालही सावलीसारख दीपिकासोबत असतो. ई टाईम्सच्या बातमीनुसार, दीपिका पदुकोण जलालला सपोर्ट स्टाफ नाही तर कुटुंबातील एक सदस्यच मानते. इतकंच नव्हे तर दीपिका जलालला भाऊ (Brother) मानते. दरवर्षी त्याला राखीही बांधते.

‘ओम शांति ओम’ या चित्रपटातून पदार्पण केल्यानंतर आजपर्यंत अनेक हिट चित्रपट देणारी दीपिका गेल्या अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणारी कलाकार म्हणून ओळखली जाते. बॉलिवूडमधील या सुपरस्टार अभिनेत्रीचे लाखो चाहते आहेत. तिची झलक बघण्यासाठी चाहते धडपडत असतात. दीपिका दिसली रे दिसली की तिच्याभोवती चाहत्यांचा गराडा पडतो. ती जाते त्या ठिकाणी मोठी गर्दी उसळते. अशावेळी तिचा दीपिकाला गर्दीपासून सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी जलालवर असते. गेल्या अनेक वर्षांपासून तो हे काम करत आहे. दीपिका आणि रणवीरच्या (Ranveer singh) लग्नात सर्व सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी जलालकडेच होती. विशेष म्हणजे या लग्नाला फक्त 30 लोक उपस्थित होते.

थक्क करणारा पगार : दीपिकाच्या संरक्षणासाठी जलालला वर्षाला तब्बल एक कोटी रुपये पगार (Salary) मिळतो. 2017 मधील ही आकडेवारी आहे. त्याआधी त्याला वर्षाला 80 लाख रुपये पगार मिळत होता. दीपिका पदुकोण सध्या अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये व्यस्त असून, लवकरच ‘83’ मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार आहे. यासोबतच ती अमिताभ बच्चन यांच्याबरोबर ‘इंटर्न’ आणि शाहरुख खानचा ‘पठाण’ या चित्रपटातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

First published:

Tags: Bollywood, Deepika padukone