Home /News /entertainment /

छोटा राजनमुळं संपलं ममता कुलकर्णीचं करिअर; द्यायची निर्मात्यांनाच धमक्या

छोटा राजनमुळं संपलं ममता कुलकर्णीचं करिअर; द्यायची निर्मात्यांनाच धमक्या

गुन्हेगारी प्रवृत्तीमुळं तिच्या करिअरला उतरती कळा लागली. (Mumbai gangster destroyed Mamta Kulkarni career) आज ममताचा वाढदिवस आहे. या निमित्तानं पाहूया या लोकप्रिय अभिनेत्रीचा गुन्हेगारी विश्वातील वावर...

    मुंबई 20 एप्रिल: ममता कुलकर्णी (Mamta Kulkarni) ही एकेकाळी बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जायची. तिनं आपल्या मादक अदांच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वत:ची अशी एक वेगळीच ओळख निर्माण केली होती. आज ममता बॉलिवूडमध्ये कार्यरत नाही. परंतु एक काळ असाची होता जेव्हा ती बॉलिवूडवर राज्य करत होती असं म्हणतात. परंतु अखेर गुन्हेगारी प्रवृत्तीमुळं तिच्या करिअरला उतरती कळा लागली. (Mumbai gangster destroyed Mamta Kulkarni career) आज ममताचा वाढदिवस आहे. या निमित्तानं पाहूया या लोकप्रिय अभिनेत्रीचा गुन्हेगारी विश्वातील वावर... ममतानं 1992 साली मेरा दिल तेरे लिये या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. तिचा पहिलाच चित्रपट फ्लॉप झाला. मात्र तिनं केलेल्या अभिनयाची प्रचंड स्तुती केली गेली. परिणामी तिला नाना पाटेकर यांच्या तिरंगा मल्टिस्टारर चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. अन् याच सुपरहिट चित्रपटामुळं ती खऱ्या अर्थानं प्रकाशझोतात आली. त्यानंतर तिनं भूकंप, वक्त हामारा है, बेताज बादशाह, गँगस्टर यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं. 90च्या दशकातील सर्वात ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून ममता ओळखली जायची. अवश्य पाहा - ‘रजिस्ट्रेशन करुन देखील लस मिळत नाही’; बॉलिवूड अभिनेत्रीनं व्यक्त केली नाराजी करिअरच्या शिखरावर असतानाच तिचा संबंध मुंबईतील गँगस्टरशी येऊ लागला. त्या काळात मुंबईतील गुन्हेगारी परमोच्च स्थानावर होती. अनेक गँगस्टर बॉलिवूड कलाकारांना अगदी सहजगतीनं भेटत असतं. दरम्यान ममताचं नाव अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनशी जोडलं गेलं. राजन आणि तिच्यामध्ये प्रेमसंबंध असल्याच्या चर्चा होऊ लागल्या. त्यामुळं पब्लिक इमेज खराब झाल्यामुळं ममताला चित्रपटात काम मिळेनासं झालं होतं. परंतु छोटा राजनद्वारे मिळणाऱ्या धमक्यांपुढं अखेर निर्मात्यांना विरोध मागे घ्यावा लागत असे. पुढे तिचं नाव ड्रग्ज माफिया विक्की गोस्वामीशी जोडलं. अंमली पदार्थांच्या तस्करीचे आरोप तिच्यावर केले जाऊ लागले. ती विक्कीसोबत लिव्हलिन रिलेशनशिपमध्ये राहात होती. त्यामुळं तिला देखील पोलीसांनी अटक केली होती. मात्र पुराव्यांअभावी ममताला शिक्षा झाली नाही. परंतु या ड्रग्जच्या खटल्यामुळं तिचं उरलंसुरलं करिअर देखील संपुष्टात आलं. अखेर तिनं बॉलिवूडच नाही भारताला देखील कायमचा रामराम ठोकला. अशा प्रकारे दशक गाजवणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्रीचा गुन्हेगारी प्रवृत्तीमुळं शेवट झाला.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Bold photoshoot, Bollywood actress, Crime, Entertainment

    पुढील बातम्या