nilमुंबई, 16 जुलै- ‘आई कुठे काय करते’ मालिका सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. या मालिकेत सध्या नीलच्या खूनाचा ट्रॅक सुरु आहे. नीलच्या खुनाच्या आरोपात अरुंधतीचा मुलगा अर्थातच यशला पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे देशमुख कुटुंबावर एक नवं संकट कोसळलं आहे. मालिकेतील हे वळण सध्या प्रचंड पसंत केलं जात आहे. यश खुनाच्या आरोपातून कसा सुटणार? कि त्याला शिक्षा होणार? अरुंधती यशची निर्दोष सुटका करण्यासाठी नेमकं काय करणार? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात घोळत आहेत. दरम्यान देशमुख कुटुंब आणि त्यांच्या जवळचे सर्व लोक अगदी ठामपणे अरुंधतीच्या मागे आहेत. आणि यश ला या संकटातून सोडवण्यासाठी विविध प्रयत्न करताना दिसून येत आहेत. मालिकेत सध्या विविध रंजक घडामोडी घडत आहेत. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता प्रचंड वाढली आहे. अशातच आता मालिकेत पुन्हा एकदा मोठा ट्विस्ट येणार आहे.या ट्विस्टमुळे अरुंधती आणि एकंदरीतच संपूर्ण देशमुख कुटुंबाला यशला निर्दोष मुक्तता करण्यास मदत होणार आहे.
(हे वाचा: Viju Mane Post:‘राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात वाजले शिवसेनेचे गाणे’, विजू मानेंची पोस्ट चर्चेत ) मराठी सिरियल्स डॉट कॉमने, नुकतंच आपल्या इन्स्टाग्राम पेजवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टनुसार, ‘आई कुठे काय करते’ मध्ये मोठी घडामोड घडणार आहे. समोर आलेल्या नव्या प्रोमोमध्ये, अरुंधती आणि आशुतोष नील कामतला अखेर गाठतात.त्यांनतर नील पुन्हा अरुंधतीसोबत उद्धट वागत तुमचं फारसं काही नुकसान न झाल्याचं म्हणतो. त्यांनतर अरुंधती त्याला एकापाठोपाठ एक कानाखाली लगावते. आणि सांगते तुझ्यामुळे माझा मुलगा गेली 5…6 दिवस तुरुंगात आहे. त्याने अन्न-पाणी सोडलंय तो डिप्रेशनमध्ये आहे. माझ्या मुलीच्या मनात पुरुषांबाबत चीड निर्माण झालीये. हे नुकसान नाहीय का? असा सवाल अरुंधती नीलला करते. प्रोमो पाहून प्रेक्षक प्रचंड उत्सुक झाले आहेत. लवकरच हा एपिसोड टीव्हीवर पाहायला मिळणार आहे.