मुंबई, 02 एप्रिल: 'पुष्पा: द राइज' (Pushpa: The Rise) या सिनेमाच्या जबरदस्त यशानंतर रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna Bollywood Movie) हे नाव केवळ दाक्षिणात्य सिनेमातीलच नव्हे तर देशभरातील मनोरंजन इंडस्ट्रीतील मोठे नाव झाले आहे. सध्या रश्मिकाचा बॉलिवूड सिनेमा कधी येणार अशीही उत्सुकता चाहत्यांसाठी लागून राहिली आहे. दरम्यान रश्मिकाच्या या चाहत्यांसाठी आज आनंदाची बातमी आहे. रश्मिका लवकरच 'Animal' या सिनेमात दिसणार आहे. रश्मिकाने इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. तिने इन्स्टा स्टोरीवर एक फोटो शेअर करत अशी कॅप्शन दिली आहे की, 'चांगला दिवस चांगल्या बातमीसह येतो'. तिने या पोस्टमध्ये 'उगडी' आणि 'गुढी पाडवा' संदर्भात GIFs ही वापरल्या आहेत. 'एनिमल' या सिनेमात रणबीर कपूर (Rasmika Mandanna and Ranbir Kapoor Animal) मुख्य भूमिकेत आहे. रणबीर आणि रश्मिका एकत्र दिसणार म्हटल्यानंतर त्यांच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. अनेकांनी रश्मिकाच्या या पोस्टचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे.
या सिनेमाचे दिग्दर्शक संदिप रेड्डी वांगा हे असून यामध्ये रणबीर-रश्मिकासह तगडी स्टारकास्ट आहे. या सिनेमात अनिल कपूर, बॉबी देओल यांचीही मुख्य भूमिका आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आधी हा सिनेमा परिणीती चोप्रा करेल अशी चर्चा होती. मात्र आता साउथ ब्युटी रश्मिकाने हा सिनेमा मिळवला आहे.
RASHMIKA MANDANNA JOINS 'ANIMAL' TEAM... #RashmikaMandanna joins the cast of #RanbirKapoor and director Sandeep Reddy Vanga's [#ArjunReddy, #KabirSingh] first collaboration #Animal... Costars #AnilKapoor and #BobbyDeol... 11 Aug 2023 #IndependenceDay wknd release. #BhushanKumar pic.twitter.com/k5J7FKWIz1
— taran adarsh (@taran_adarsh) April 2, 2022
या सिनेमाचे शूटिंग लवकरच सुरू होणार असून पुढील वर्षी 11 ऑगस्ट 2023 रोजी हा सिनेमा थिएटरमध्ये येण्याची शक्यता आहे. याबाबतची माहिती तरण आदर्श यांनी ट्वीट करत दिली आहे. हा सिनेमा एक क्राइम ड्रामा असणार आहे. एनिमलची निर्मिती भूषण कुमार आणि कृष्ण कुमार यांची टी-सीरिज, मुराद खेतानीचा सिने1 स्टुडिओ आणि प्रणय रेड्डी वांगाचे भद्रकाली प्रोडक्शन याद्वारे करण्यात आली आहे.
हे वाचा-अनुष्काच्या Look वर विराट कोहली क्लीन बोल्ड, पत्नीला एकटक बघतच राहिला खेळाडू
पुष्पामधून देशभरातून चाहते कमावलेले ही 'श्रीवल्ली' आता बॉलिवूडमध्येही जम बसवण्यास सज्ज झाली आहे. ती सध्या अमिताभ बच्चन यांच्यासह 'गुडबाय' तर सिद्धार्थ मल्होत्रासह 'मिशन मजनू' या सिनेमांवर देखील काम करत आहे. या दोन्ही सिनेमांच्या सेटवरीलही तिचे फोटो अलीकडेच व्हायरल झाले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bobby deol, Ranbir kapoor, Rashmika mandanna