भारतीय क्रिकेटर विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माची जोडी प्रचंड लोकप्रिय आहे. या दोघांचा मोठा चाहतावर्ग आहे. चाहते नेहमीच त्यांच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आणि त्यांचे रोमँटिक फोटो पाहण्यासाठी उत्सुक असतात.
अनुष्का शर्माने नुकतंच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती पती विराटसोबत जबरदस्त लुकमध्ये दिसून येत आहे.
अनुष्का शर्माची किलर स्टाईल पाहून विराट कोहलीसुद्धा थक्क झाला आहे. पत्नीच्या चेहऱ्यावरून नजर हटवणं त्याला कठीण झालं आहे.हे फोटो शेअर करत अनुष्काने कॅप्शनसुद्धा लिहिलंय.
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली हे परफेक्ट कपल समजले जातात.
या दोघांची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. त्यामुळेच अनुष्काच्या या फोटोंना तासाभरात साडेआठ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांची पहिली भेट 2013 मध्ये एका जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान झाली होती.