Home /News /entertainment /

Pushpa फेम रश्मिकाने प्रमोशनसाठी नेसलेल्या या ऑफ-व्हाईट साडीची किंमत वाचून बसेल धक्का

Pushpa फेम रश्मिकाने प्रमोशनसाठी नेसलेल्या या ऑफ-व्हाईट साडीची किंमत वाचून बसेल धक्का

Pushpa The Rise : या सिनेमामुळे देशभर प्रसिद्ध झालेली रश्मिका मंदाना आता national crush म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. तिच्या प्रत्येक दर्शनावर प्रेक्षकांचं लक्ष असतं. आता ती सिनेमाच्या प्रमोशनसाठी ही साधी वाटणारी साडी नेसून आली पण...

पुढे वाचा ...
मुंबई, 24 जानेवारी: साऊथच्या चित्रपटातील (south cinema) अभिनेत्री रश्मिका मंदानाचे (Rashimka mandana latest saree look) Pushpa The Rise या सिनेमानंतर लाखो फॅन्स झाले आहेत. ती आता नॅशनल क्रश (national crush) म्हणूनही ओळखली जाते. तिच्या याआधीच्या ‘गीता गोविंदम’ चित्रपटाने तर चाहत्यांना भुरळ घातली होती. नुकताच प्रदर्शित झालेल्या पुष्पा (pushpa) चित्रपटात रश्मिकाने श्रीवल्ली नावाची भूमिका साकारली आहे. अल्लू अर्जूनची (Allu Arjun) मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान चालला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा रश्मिका मंदाना चांगलीच चर्चेत आहे. त्यातच तिचा साडीतला एक फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. या साडीची किंमत किती आहे हे तुम्हाला माहिती आहे का? रश्मिकाने ‘पुष्पा: द राइजिंग’ (Pushpa The Rise Cast) या चित्रपटाच्या हैदराबादमधील प्रमोशनसाठी (Pushpa promotion) ऑर्गेन्झा (organza ) साडी नेसली होती. या साडीत ती अतिशय सुंदर दिसत होती.

विषय हार्ड ! 'पुष्पा' मधील श्रीवल्लीचा नादखुळा मराठी रिमेक पाहिला का?

 रश्मिकाने तिच्या या साडीतील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्याला तिने (Let the beauty of what you love be what you do. -Rumi ) “तुम्ही जे करता त्यातूनच तुमचं प्रेम प्रकटू दे,” असं कॅप्शन टाकलंय.
हँडक्राफ्टेड (handcrafted) ऑफ व्हाईट ऑर्गेन्झा साडी डिझायनर अंकिता जैनने डिझाईन केलेली आहे. साडीमधील या फोटोमध्ये रश्मिका सुंदर आणि आकर्षक दिसत आहे. या साडीची किंमत 31,500 रुपये आहे. रश्मिकाने नेसलेल्या या साडीला लुना साडी म्हणतात. इंडिया डॉट कॉमने यासंदर्भात वृत्त दिलंय. रश्मिकाच्या या फ्लुइड ऑर्गेन्झा ऑफ-व्हाइट साडीमध्ये पदर, प्लेट्स आणि बॉर्डरवर फ्लोरल पॅटर्नमध्ये रॉ सिल्कच्या बॉर्डरचं अत्यंत नाजूक डिझाईन काढलं आहे. तिने या साडीसोबत डचेस सॅटिन प्रकारातला मोत्याचा पांढरा स्लीव्हलेस ब्लाउज (Rashmika in sleeveless blouse) घातला होता.

Pushpa मधील Item Song साठी समंथाने घेतले इतके कोटी! अल्लू अर्जूनच्या विनवणीनंतर झाली होती तयार

 दरम्यान, रश्मिका सोशल मीडियावरून फोटोज शेअर करत असते. ती सोशल मीडियावर चांगलीच अक्टिव्ह आहे. नुकतंच तिने एक फोटो शेअर केल्यानंतर तिच्या आणि तेलुगू सुपरस्टार विजय देवरकोंडा (vijay devarkonda) यांच्या अफेअरची चर्चा देखील रंगली होती. नवीन वर्षाच्या सुरुवातीला रश्मिकानं चाहत्यांना शुभेच्छा देत स्वतःचा एक फोटो शेअर केला होता. रश्मिकाचा हा फोटो त्यावेळी चर्चेत आला जेव्हा विजय देवरकोंडाचा भाऊ आनंदनं त्याच बॅकग्राउंड आणि लोकेशनचा फोटो शेअर केला. या दोघांचे फोटो समोर आल्यानंतर या रश्मिका आणि विजय यांच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आलं होतं.
First published:

Tags: South actress, South film

पुढील बातम्या