मुंबई, 18 जानेवारी: सध्या दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा स्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘पुष्पा : द राइज’ (Pushpa : The Rise) या चित्रपटाची जोरदार चर्चा आहेच; पण त्यातही सर्वाधिक गाजतंय ते यातलं समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) हिचं आयटम सॉंग. बॉक्स ऑफिसवर छप्पर फाड के कमाई करणारा हा चित्रपट हिंदी आणि अन्य भाषांमध्येही प्रदर्शित झाला असून, चाहत्यांचा त्याला उदंड प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटातल्या समंथा रुथ प्रभूच्या ‘ऊ अंटावा ऊ ऊ अंटावा’ (Oo Antawa) या गाण्यावरच्या डान्सने तर चाहत्यांना वेड लावलं आहे. या गाण्यासाठी समंथाचं सर्वत्र कौतुक होत असून, चाहतेच नव्हे तर क्रिती सॅनॉन, संजीदा शेख यांच्यासह अनेक सहकलाकार, अभिनेत्रींनी तिची प्रशंसा केली आहे. मात्र चित्रपटात हा डान्स करण्याकरिता समंथाचा होकार मिळवण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागल्याची चर्चा आहे. स्वतः अल्लू अर्जुननं समंथा रुथ प्रभू हिला या गाण्यावर डान्स करण्यासाठी तयार केलं. एवढंच नाही, तर केवळ तीन मिनिटांच्या गाण्यासाठी तिनं तब्बल 5 कोटी रुपये इतकं तगडं मानधन (5 crore ruppees Charges) आकारल्याचंही समोर आलं आहे. हे वाचा- सर जडेजावर पुष्पाची जादू, अल्लू अर्जुनच्या लुकमधील Photo Viral IWMBUZZ च्या रिपोर्टनुसार सूत्रांनी सुभाष के. झा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘या डान्स नंबरसाठी समंथा सुरुवातीला तयारच नव्हती. अखेर अल्लू अर्जुननं स्वतः तिला समजावलं, तेव्हा कुठं ती तयार झाली; मात्र या केवळ 3 मिनिटांच्या डान्स नंबरसाठी तिला जवळपास 5 कोटी रुपये मोजावे लागले. या डान्समधल्या काही स्टेप्सबाबतही ती साशंक होती; मात्र नंतर तिनं त्यावर काम केलं. मग तिनं एकही स्टेप बदलण्याची मागणी केली नाही.’ मीडिया अहवालानुसार, आता ‘पुष्पा : द राइज’चा सिक्वेल असलेल्या ‘पुष्पा 2’मध्येही (Pushpa 2) समंथाचं आणखी एक खास गाणं (Special Song) ठेवण्याचा विचार केला जात असल्याची माहिती समोर आली आहे. हे वाचा- ‘घटस्फोट मृत्यूपेक्षाही भयानक’,‘महाभारत’ फेम नितीश भारद्वाज यांचा खुलासा दरम्यान, समंथाच्या या गाण्यानं डिसेंबरमध्येच तब्बल 10 कोटी व्ह्यूजचा टप्पा पार केला आहे. पुष्पा चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर काही वेळातच समंथानं इन्स्टाग्रामवर जाऊन अल्लू अर्जुन आणि पुष्पाच्या टीमचे आभार मानले. तिने गाण्यातला एक फोटो शेअर करून त्यावर एक पोस्ट लिहिली आहे. ‘मी चांगलं काम केलं, मी वाईट कामही केलं, मी विनोदी काम केलं, तसंच गंभीर भूमिकाही केली. मी एक चॅट शोदेखील होस्ट केला. मी जे काही काम हाती घेते ते उत्कृष्ट होण्यासाठी कठोर परिश्रम करते; पण सेक्सी होणं हे खूप कठीण आहे. त्यासाठी खरंच खूप कष्ट घ्यावे लागतात… phew #ooantavaooooantava प्रेमाबद्दल धन्यवाद .’ असं तिनं म्हटलं आहे.
अलीकडच्या काळात नागा चैतन्यबरोबर घटस्फोट झाल्यानं चर्चेत आलेली समंथा कामाच्या आघाडीवर चांगलीच झेप घेत असून, ती ‘अरेंजमेंट्स ऑफ लव्ह’ हा तिचा पहिला आंतरराष्ट्रीय चित्रपट, तसंच प्रसिद्ध अभिनेता विजय सेतुपती आणि नयनतारा यांच्यासह काथुवाकुला रेंडू काधल या चित्रपटाच्या कामात व्यग्र आहे.