

अनेक मालिकांमध्ये मुख्य भूमिकेत दिसलेला अभिनेता राम कपूर अद्याप टीव्ही इंडस्ट्रीमध्ये दिलेल्या सर्वात मोठ्या इंटीमेट सीनसाठी प्रेक्षकांच्या लक्षात आहे.


ही त्यावेळची गोष्ट आहे जेव्हा राम कपूर आणि साक्षी तन्वर 'बडे अच्छे लगते है' या मालिकेत काम करत होते. TRP च्या बाबतीत हा शो सर्वात पुढे तर होताच पण या इंटीमेट सीननं त्यावेळी धुमाकूळ घातला होता.


'बडे अच्छे लगते हैं'मध्ये दाखवण्यात आलेला हा 17 मिनिटांचा सीन टीव्ही विश्वातला सर्वात मोठा इंटीमेट सीन मानला जातो.


राम कपूरनं त्याच्या करिअरची सिरुवात 1997 मध्ये आलेल्या 'न्यास' या मालिकेतून केली होती. 2000 मध्ये त्यानं स्मृती इराणी यांच्यासोबत कविता या मालिकेत काम केलं आणि हा शो खूप लोकप्रिय सुद्धा ठरला.


यानंतर राम कपूरनं अनेक मालिकांमध्ये काम केलं. याशिवाय त्यानं 'धडकन' आणि 'हजारों ख्वाहिशें ऐसी' या सिनेमांतही काम केलं.


अभिनयाव्यतिरिक्त राम कपूरनं होस्ट म्हणून सुद्धा काम केलं. त्यानं राखी का स्वयंवर हा शो होस्ट केला होता. त्यानंतर सध्या तो जिंदगी के क्रॉसरोड्समध्ये होस्ट म्हणून काम पाहत आहे.