मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

83 Tax Free: रणवीर सिंहचा '83' या राज्यात टॅक्स फ्री; कमी पैशात पाहता येणार चित्रपट

83 Tax Free: रणवीर सिंहचा '83' या राज्यात टॅक्स फ्री; कमी पैशात पाहता येणार चित्रपट

बॉलिवूड  (Bollywood) अभिनेता रणवीर सिंह  (Ranveer Singh) आणि दीपिका पादुकोण (Deepika Padukone) यांचा बहुचर्चित चित्रपट '83'साठी निर्मात्यांनी मोठी घोषणा केली आहे.

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि दीपिका पादुकोण (Deepika Padukone) यांचा बहुचर्चित चित्रपट '83'साठी निर्मात्यांनी मोठी घोषणा केली आहे.

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि दीपिका पादुकोण (Deepika Padukone) यांचा बहुचर्चित चित्रपट '83'साठी निर्मात्यांनी मोठी घोषणा केली आहे.

  मुंबई, 22 डिसेंबर-   बॉलिवूड    (Bollywood)  अभिनेता रणवीर सिंह   (Ranveer Singh)  आणि दीपिका पादुकोण  (Deepika Padukone)  यांचा बहुचर्चित चित्रपट '83'साठी निर्मात्यांनी मोठी घोषणा केली आहे. दिल्लीत   (Delhi)  हा चित्रपट टॅक्स फ्री  (Tax Free)  झाल्याचं निर्मात्यांनी सांगितलं आहे. दिल्ली सरकारनेही मंगळवारी हा चित्रपट टॅक्स फ्री झाल्याची घोषणा केली आहे. चित्रपट करमुक्त झाल्यामुळे प्रेक्षकांना काहीसा दिलासा मिळणार असून ते जास्तीत जास्त चित्रपटगृहांमध्ये जातील. हा चित्रपट भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि क्रिकेटपटू कपिल देव  (Kapil Dev)  आणि 1983 च्या क्रिकेट विश्वचषकातील भारताच्या विजयावर आधारित आहे. 83 या चित्रपटात रणवीर सिंह दिग्गज क्रिकेटर कपिल देव यांची भूमिका साकारत आहे. तर दीपिका पादुकोण त्यांची पत्नी रोमी देव यांची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट रिलायन्स एंटरटेनमेंट आणि फॅंटम फिल्म्स यांच्याकडून प्रस्तुत केला जात आहे. हा चित्रपट 24 डिसेंबरला हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये देशभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. परंतु चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी, बॉलिवूड कलाकार आणि चित्रपट समीक्षकांसाठी प्रीमियर करण्यात आला आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी चित्रपटाला ४ स्टार दिले आहेत. तर सुनील शेट्टी चित्रपटाचा प्रीमियर पाहिल्यानंतर अतिशय भावुक होताना दिसून आले. त्यांनी रणवीर सिंहच्या अभिनयाचं कौतुक केलं. सुनील शेट्टीनं ट्विट करत लिहिलं की, “83 ला भेटायला गेलो, पण रणवीर सिंह कुठंच दिसला नाही. त्याचा शोध लागला नाही. पडद्यावर फक्त आणि फक्त कपिल देव होते. अविश्वसनीय बदल. मला आश्चर्य वाटतं.एक टीम कास्ट जी लॉर्ड्समधून बाहेर पडते. '83 पाहून मी चकित झालो आहे'. कलात्मकता आणि भावना पाहून मी अजूनही हादरलो आहे . आणि माझ्या डोळ्यात अश्रू आहेत. (हे वाचा:कपिल देव यांना हुबेहूब कॉपी करण्यासाठी रणवीर 6 महिने 4 तास खेळत होता क्रिकेट) कपिल देव बनण्यासाठी रणवीर सिंहनं अशी घेतली मेहनत- रणवीर सिंहनं कपिल देव यांच्याप्रमाणे बॉलिंग आणि बॅटिंग करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. कपिल देव यांच्या प्रसिद्ध नटराज पोझमधील रणवीरला बॉलिंग अॅक्शनमध्ये पाहण्यासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. रणवीरच्या या अॅक्शनचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 1983 मध्ये भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकल्याची कथा कबीर खान यांनी मोठ्या पडद्यावर मांडली आहे.यामध्ये कपिल देव यांनी हुबेहूब कॉपी करण्यासाठी रणवीर सिंह 6 महिने रोज 4 तास क्रिकेट खेळायचा आणि 6 महिने 2 तास फिजिकल कंडिशनिंग करायचा. परिपूर्णता आणण्यासाठी त्यानं तासनतास मेहनत केली आहे.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Deepika padukone, Entertainment, Ranveer sigh

  पुढील बातम्या