लाखो रुपये खर्च करुन 'या' ठिकाणाहून जेवण ऑर्डर करतात रणवीर-दीपिका

लाखो रुपये खर्च करुन 'या' ठिकाणाहून जेवण ऑर्डर करतात रणवीर-दीपिका

बॉलिवूड सेलिब्रिटी शूटिंगच्या बिझी शेड्यूमध्येही स्वतःला फिट ठेवतात. त्यामुळे त्यांच्या डाएट प्लान विषयी सर्वांना खूप उत्सुकता असते.

  • Share this:

मुंबई, 03 नोव्हेंबर : बॉलिवूड सेलिब्रिटी शूटिंगच्या बिझी शेड्यूमध्येही स्वतःला फिट ठेवतात. मग हे सेलिब्रिटी नक्की कशा प्रकारचं जेवणं घेतात. दिवसभर काय खातात. असं कोण आहे जे त्यांच्या डाएटची काळजी घेतं. यासाठी त्यांच्याकडे फिटनेस ट्रेनर्स तर असतात मात्र याशिवाय आता त्यांच्या डाएटविषयी नवा खुलासा झाला आहे. यामुळे सेलेब्स त्यांची डाएट प्लान कशाप्रकारे मेंटेन करतात हे समोर आलं आहे. रणवीर सिंह, दीपिका पादुकोण, अक्षय कुमार, अर्जुन कपूर अशा एका सर्व्हीसकडून जेवण मागवतात. जे त्यांच्या हेल्दी डाएटची काळजी घेतात.

'या' अभिनेत्यासोबत आर्चीला जायचंय डेटवर, रिलेशनशिप स्टेटस बद्दल म्हणते...

 

View this post on Instagram

 

red carpet ready...💋

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

बॉलिवूड सेलिब्रिटीच्या डाएट प्लान विषयी अनेकांना कुतूहल असतं. तर त्यासाठी अशी एक सर्व्हीस आहे जे या सेलिब्रिटींना फुड सप्लाय करतात. Pod Supply असं या सर्व्हीसचं नाव आहे. ही एक मील सर्व्हीस आहे. जे या सेलिब्रिटींच्या हेल्दी फुडसाठी लाखो रुपये चार्ज घेतात. साठी लाखो रुपये चार्ज घेतात. ‘83’ च्या शूटिंग शेड्यूल दरम्यान रणवीर सिंह याचं सर्व्हिसमधून जेवण ऑर्डर खातो. तर अभिनेता आदित्य रॉयनं सुद्धा मलंगच्या शेड्यूलवेळी इथूनच टीफिन सर्व्हिस घेतो. खिलाडी अक्षय कुमार आणि अनिल कपूर हे सुद्धा शूटिंग दरम्यान या ठीकाणचेच जेवण घेणं पसंत करतात.

… म्हणून सनी लिओनी कधीच पाहत नाही आपल्या आई-बाबांचा फोटो

 

View this post on Instagram

 

A post shared by anilskapoor (@anilskapoor) on

आता बॉलिवूडकर तर जेवणासाठी एवढा पैसा खर्च करतात मात्र सामान्य लोकांना हे शक्य नाही. त्यामुळे आता सामान्य लोकांसाठी पॉड सप्लाय लवकरच लाइट सर्व्हिस सुरू करण्याच्या तयारीत आहेत. ज्यामुळे सामान्य लोकही त्यांच्या आवडत्या सेलेब्सप्रमाणे हेल्दी डाएट घेऊ शकणार आहेत. जे लोक त्यांच्या डाएटबाबत खूप जागरूक आहेत मात्र त्याच्याकडे वेळ नाही अशा लोकांसाठी हे फायद्याचं ठरणार आहे.

OMG! श्रद्धा कपूरनं आयुष्यातल्या महत्त्वाच्या व्यक्तीला मराठीतून दिल्या शुभेच्छा

=============================================================

परतीच्या पावसामुळे पिकांचं नुकसान; शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू, पाहा GROUND REPORT

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 3, 2019 01:18 PM IST

ताज्या बातम्या