आपण यांना ओळखलंत का? या अभिनेत्याच्या फोटोनं इंटरनेटवर Throwback ला उधाण

मैत्रिणीला मिठी मारलेला, रेघारेघांचा शर्ट घातलेला, खांद्यापर्यंत केस वाढलेला हा तरुण ओळखीचा वाटतोय का? नीट बघितल्यावर लक्षात येईल हा अभिनेता कोण?

News18 Lokmat | Updated On: Jul 11, 2019 05:26 PM IST

आपण यांना ओळखलंत का? या अभिनेत्याच्या फोटोनं इंटरनेटवर Throwback ला उधाण

मुंबई, 11 जून : मैत्रिणीला मिठी मारलेला, रेघारेघांचा शर्ट घातलेला, खांद्यापर्यंत केस वाढलेला हा तरुण ओळखीचा वाटतोय का? नीट बघितल्यावर लक्षात येईल हा अभिनेता कोण? रणवीर सिंगचा हा फोटो त्याच्या एका फॅननं सोशल मीडियावर शेअर केला  आहे. यानंतर सोशल मीडियावर अशा Throwback pic चं उधाण आलं आहे. रणवीरचा हा फोटो लगेच व्हायरल होऊ लागला आहे. एका मैत्रिणीबरोबरच्या रणवीरच्या या फोटोत तो ओळखू येणार नाही इतका वेगळा दिसतो आहे. Ranveer Singh is the best या नावाने असलेल्या इन्स्टाग्राम हँडलवरून हा फोटो शेअर झाला आहे.  यावर रणवीरने काही प्रतिक्रिया दिलेली नाही.

रणवीर सध्या UK मध्ये एका सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. 83 या चित्रपटात तो पत्नी दीपिका पदुकोणबरोबरच काम करणार आहे. त्यात रणवीरने कपिल देवची भूमिका निभावली आहे. 1983 मध्ये भारताने पहिल्यांदा World Cup जिंकला होता, त्याची ही कहाणी आहे. कबीर खान या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. रणवीरचा कपिल देवच्या अवतारातला फर्स्ट लुक नुकताच प्रसिद्ध झाला.  त्याच दिवशी म्हणजे 6 जूनला दीपिका पदुकोणनं आपल्या नवऱ्याचा लहानपणचा फोटो तिच्या ऑफिशिअल इन्स्टाग्राम हँडलवरून शेअर केला आणि त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Sand Ki Aankh Teaser: घरच्यांवरच गोळी चालवणाऱ्या तापसी- भूमीचा अॅक्शनपॅक्ड स्वॅग

दीपिकाने शेअर केलेल्या या फोटोत अगदी लहानगा रणवीर दिसतो आहे. माझा नवरा, माझा मित्र, माझं प्रेम असं लिहून दीपिकाने त्याला शुभेच्छा दिल्यात. प्रेमाने त्याला माझं बाळ, माझा मुलगा, माझा लाडका... असंही दीपिकाने म्हटलं आहे. दीपिकाने शेअर केलेला बर्फाचा गोळा खाणारा छोटा रणवीरही चाहत्यांना फार आवडला होता. तो फोटोसुद्धा व्हायरल झाला होता.

VIDEO : धोनीचा फोटो काढताना फोटोग्राफरलाही रडू कोसळलं

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 11, 2019 05:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...