मुंबई, 29 ऑगस्ट: बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहनं नुकतंच न्यूड फोटोशूट केलं होतं. या फोटोशूटमुळे तो सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल झालेला पहायला मिळाला. न्यूड फोटोशूट प्रकरणी रणवीर सिंहवर एफआयआर देखील दाखल करण्यात आली तेव्हापासून त्याच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्याच्या दिसून येत आहे. अशातच रणवीरने आज मुंबईतील चेम्बूर पोलीस ठाण्यात हजेरी लावली. रणवीर सिंहनं आज चेम्बूर पोलीस स्टेशमध्ये हजेरी लावत स्टेंटमेंट नोंदवलं. यावेळी दोन तास तो पोलीस स्टेशनमध्ये स्टेटमेंट नोंदवत होता. यावेळी पोलिसांनी रणवीरला अनेक प्रश्नांनी घेरलं. ‘न्यूड फोटोशूटचं कॉन्टॅक्ट कोणत्या कंपनीसोबत होतं, कधी आणि कुठे फोटोशूट केलं, अशा प्रकारच्या फोटोशूटने जनसामान्यांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात याचं काही भान तुला आहे का?’, अशा अनेक प्रश्नांचा भडीमार रणवीर करण्यात आला. यावेळी रणवीर आणि त्याच्या टीमने म्हटलं की पुढच्या तपासातही सहभागी होत पूर्णपणे सहकार्य करणार. हेही वाचा - Shilpa Shetty चा मुलगा वयाच्या 10 व्या वर्षी बनला बिझनेसमॅन; सुरु केला अनोखा व्यवसाय रणवीरविरोधात मुंबई पोलिसात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर मुंबई पोलिसांनी रणवीरला समन्स पाठवून 22 ऑगस्ट, सोमवारी हजर होण्यासाठी सांगितलं होतं. पोलीस ठाण्यात हजर होण्यासाठी रणवीरने 2 आठवड्यांची मुदत मागितली होती. त्यानंतर रणवीर आज चौकशीसाठी चेम्बूरमध्ये पोहचला.
दरम्यान, रणवीर सिंहने पेपर मॅगझिनसाठी हे अतिशय बोल्ड फोटोशूट केलं आहे. या फोटोंमध्ये अभिनेता पूर्णपणे कपड्यांशिवाय दिसत आहे. कार्पेटवर बसून रणवीर वेगवेगळ्या स्टाइलमध्ये पोज देताना दिसून येत आहे. रणवीरनं केलेल्या न्यूड फोटोशूटला अनेक मोठमोठ्या कलाकरांनी पाठिंबा दर्शवला आहे.