'माझी आजी खालच्या जातीतील होती, आजही समाजाने आम्हाला स्वीकारलं नाही', प्रसिद्ध अभिनेत्याने व्यक्त केलं दु:ख

'माझी आजी खालच्या जातीतील होती, आजही समाजाने आम्हाला स्वीकारलं नाही', प्रसिद्ध अभिनेत्याने व्यक्त केलं दु:ख

बॉलिवूड अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकेने समाजातील जातीव्यवस्थेचे जोखड तोडून टाकण्याचे आवाहन केले आहे. आपल्या समाजात जातीगत भेदभाग खूप खोलपर्यंत रुतले असल्याचेही तो म्हणाला

  • Share this:

नवी दिल्ली, 09 ऑक्टोबर : अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) सध्या यशाच्या शिखरावर आहे. ज्या सिनेमात नवाझ काम करतो, त्यामध्ये खास नवाझुद्दीन टच प्रेक्षकांना पाहायला मिळतो. मात्र आज एवढी प्रसिद्धी मिळण्यामागे खूप मोठा संघर्ष आहे. आणि नवाझुद्दीन ने नुकत्याच दिलेल्या प्रतिक्रियेनुसार हा संघर्ष अद्याप सुरू आहे.

नवाझुद्दीन सिद्दीकेने समाजातील जातीव्यवस्थेचे जोखड तोडून टाकण्याचे आवाहन केले आहे. आपल्या समाजात जातीगत भेदभाग खूप खोलपर्यंत रुतले असल्याचेही तो म्हणाला. मुळचा उत्तर प्रदेशातील असणाऱ्या नवाझने असे सांगितले की, त्यांच्या आजीच्या जातीमुळे अजूनही त्याच्या गावातील काही लोकांनी त्यांचा स्वीकार केला नाही आहे. एनडीटीव्हीशी केलेल्या एका संभाषणात त्याने याबाबत भाष्य केले आहे. हाथरस सामुहिक बलात्कार प्रकरणाबाबत बोलताना त्याने ही माहिती दिली. हाथरस सामुहिक बलात्काराची घटना अत्यंत दुर्भाग्यपूर्ण होती आणि लोकं आवाज उठवत आहेत ही चांगली बाब आहे अशी प्रतिक्रिया नवाझुद्दीन सिद्दीकीने दिली आहे.

(हे वाचा-जायरा वसीमनंतर आता आणखी एका अभिनेत्रीनं इस्लामसाठी सोडलं बॉलिवूड, म्हणाली...)

नवाझुद्दीनने असे म्हटले की, 'माझी आजी खालच्या जातीची होती, तर माझे संपूर्ण कुटुंब शेख होते. यामुळे गावातील लोक अजूनही माझ्या कुटूंबाकडे चांगल्या नजरेने पाहत नाहीत.' यावेळी नवाझने शहरी भागातील जातीय संस्कृती आणि ग्रामीण भागातील जातीय संस्कृती याबाबत भाष्य केले. तो असे म्हणाला की शहरी भागात जरी काही प्रमाणात जातीव्यवस्था गौण असली तरी ग्रामीण भागात त्याचा पगडा अजूनही आहे. एकाच समुदायामध्ये छोट्या-मोठ्या जातींमध्ये भेदभाव केला जातो.

(हे वाचा-'जिवंतपणी त्यांच्यासाठी काही करू शकलो नाही',विलासरावांबद्दल बोलताना रितेश भावुक)

नवाझुद्दीन पुढे असे म्हणाला की, असा भेदभाव करणाऱ्यांना तुम्ही अभिनेते आहात किंवा धनाढ्य आहात. सोशल मीडियाचा आवाज गावापर्यंत पोहोचत नाही याबाबत देखील त्याने दु:ख व्यक्त केले.

Published by: Janhavi Bhatkar
First published: October 9, 2020, 2:53 PM IST
Tags: Bollywood

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading