मुंबई, 21 जुलै- बॉलिवूड कलाकार आणि त्यांची लाईफस्टाईल हा नेहमीच कुतूहलाचा विषय असतो. सेलिब्रेटी विविध ठिकाणी आपल्या पैशांची गुंतवणूक करताना दिसून येतात. असंच काहीसं रणवीर आणि दीपिका पादुकोणचंसुद्धा आहे. इंडस्ट्रीच्या या सर्वात चर्चित कपलने नुकतंच कोट्यावधींचं एक आलिशान घर खरेदी केलं आहे. आता या घराचा पहिला व्हिडीओ समोर आला आहे. आणि तो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अभिनेता रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोणने नुकतंच एक घर खरेदी केलं आहे. हे घर मुंबईतील हायफाय एरिया असणाऱ्या वांद्रयात म्हणजेच ईस्ट मुंबईत आहे. विशेषम्हणजे हे घर बॉलिवूड किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहरुख खानच्या ‘मन्नत’ बंगल्याच्या अगदी शेजारी आहे. रणवीर आणि दीपिकाने तब्बल 7.13 कोटींच्या स्टँप ड्युटीवर हे घर खरेदी केलं आहे. या सेलेब्रेटी कपलचं हे घर सी फेसिंग आहे. त्यामुळे तेथून मुंबईच्या निळाशार समुद्राचे सुंदर दृश्य दिसणार यात शंकाच नाही. सागर रेशम अपार्टमेंटमध्ये असणाऱ्या या घराची किंमत तब्बल 119 कोटी इतकी आहे. त्याच्या किंमतीवरुनच त्याची भव्यता लक्षात येते. दरम्यान रणवीर आणि दीपिकाच्या या नव्या घराचा पहिला व्हिडीओ समोर आला आहे. आणि हा व्हिडीओ मीडियावर व्हायरलदेखील झाला आहे. इन्स्टंट बॉलिवूड या इन्स्टाग्राम पेजवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ रणवीर आणि दीपिकाच्या नव्या घराचा असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या व्हिडीओमध्ये एक कन्स्ट्रक्शन अपार्टमेंट दिसत आहे. ज्याठिकाणी काम सुरु आहे. शिवाय ते अपार्टमेंट शाहरुख खानच्या बंगल्याच्या अगदी जवळच असल्याचं कॅमेऱ्याच्या साहाय्याने दाखवण्यात आलं आहे.
**(हे वाचा:** Kareena Kapoor Khan: तिसऱ्यांदा आई बनणार करीना कपूर? अभिनेत्रीने स्वतः केला खुलासा ) मीडिया रिपोर्टनुसार, दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंहनं ‘ओह फाइव्ह ओह मीडिया वर्क्स एलएलपी’ या फर्मद्वारे हे आलिशान घर खरेदी केलं आहे. रणवीर सिंह आणि त्याचे वडील या कंपनीचे दिग्दर्शक आहेत. रणवीरनं खरेदी केलेल्या सी फेसिंग हाऊसची किंमत तब्बल 119 कोटी इतकी आहे. या सेलिब्रेटी कपलचं हे नवं घर इमारतीच्या 16 व्या , 17 व्या आणि 18 व्या मजल्यावर पसरलेलं आहे. विशेष म्हणजे यामध्ये 19 पार्किंग स्लाॅट आहेत. अपार्टमेंटमध्ये एकूण 11,266 स्क्वेअर फूट कार्पेट एरिया आणि 1,300 स्क्वेअर फूट एक्सक्लुझिव्ह टेरेस आहे. नव्या सीव्ह्यू बंगल्याची स्टँप ड्यूटीच 7.13 कोटी भरली आहे. आता या नव्या घराच्या कन्स्ट्रक्शनचं काम जोरात सुरु आहे.