मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'83'च्या निर्मात्यांना बसणार मोठा दणका! रिलीज होताच LEAK झाला रणवीर सिंहचा चित्रपट

'83'च्या निर्मात्यांना बसणार मोठा दणका! रिलीज होताच LEAK झाला रणवीर सिंहचा चित्रपट

बॉलिवूड   (Bollywood)  अभिनेता रणवीर सिंहचा   (Ranveer Singh)  बहुप्रतीक्षित '83'  हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाला उत्तम रिव्ह्यू मिळत आहेत.

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता रणवीर सिंहचा (Ranveer Singh) बहुप्रतीक्षित '83' हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाला उत्तम रिव्ह्यू मिळत आहेत.

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता रणवीर सिंहचा (Ranveer Singh) बहुप्रतीक्षित '83' हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाला उत्तम रिव्ह्यू मिळत आहेत.

मुंबई,24  डिसेंबर-   बॉलिवूड   (Bollywood)  अभिनेता रणवीर सिंहचा   (Ranveer Singh)  बहुप्रतीक्षित '83'  हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाला उत्तम रिव्ह्यू मिळत आहेत. कबीर खान   (Kabir Khan)  दिग्दर्शित या चित्रपटाची गेल्या अडीच वर्षांपासून चाहते आतुरतेने वाट पाहत होते. 83 चित्रपटाची कथा 1983 च्या क्रिकेट विश्वचषकावर आधारित आहे. जेव्हा भारतीय क्रिकेट संघाने 1983 चा विश्वचषक जिंकला होता. चित्रपटाची स्टारकास्ट खूपच दमदार आहे. चित्रपटाच्या चांगल्या सुरुवातीनंतर निर्मात्यांसाठी एक वाईट बातमी आहे. याचा परिणाम 83 च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर होऊ शकतो. ती गोष्ट म्हणजे हा चित्रपट इंटरनेटवर लीक   (83 Leak)  झाला आहे.

चित्रपटांच्या समीक्षकांचं मत आहे, की हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कामगिरी करणार आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करून इतिहास रुचेल अशी अपेक्षा समीक्षकांनी व्यक्त केली आहे. मात्र रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोणचा ८३ हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होताच लीक झाल्याचं समोर आलं आहे. सर्व मोठ्या चित्रपटांना ऑनलाईन लीक करणाऱ्या तामिळ रॉकर्स या वेबसाईटनंसुद्धा ८३ लीक केला आहे.

तामिळ रॉकर्स व्यतिरिक्त, Filmyzilla, Mp4moviez, Filmywap, Moviesflix वर चित्रपट लीक झाला आहे. या वेबसाइट्सवर पूर्ण चित्रपट एचडीमध्ये पाहायला उपलब्ध आहे.मीडिया रिपोर्ट्सनुसार, आतापर्यंत अनेकांनी 83 हा चित्रपट फ्रीमध्ये डाउनलोड केला आहे. आणि ही प्रक्रिया अजूनही सुरू आहे. तामिळ रॉकर्सने आतापर्यंत अनेक चित्रपटांच्या व्यवसायावर प्रतिकुल परिणाम केला आहे. 83 हा चित्रपट इंटरनेटवर लीक झाल्यामुळे पहिल्या दिवशी त्याची कमाई 5 कोटींनी कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

(हे वाचा:VIDEO: दीपिका पादुकोणनं सिद्धिविनायक मंदिरात जाऊन घेतलं बाप्पाचं दर्शन )

सोशल मीडियावर या चित्रपटाचं प्रचंड कौतुक होत आहे. रणवीर सिंहसोबतच संपूर्ण चित्रपटातील कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला आहे. कबीर खान यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. रणवीर आणि दीपिकासोबत या चित्रपटात जतिन सरना, ताहिर राज भसीन, आदिनाथ कोठारे, एमी विर्क, हार्डी संधू, साकिब सलीम, पंकज त्रिपाठी यांच्यासह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसून आले आहेत.

First published:
top videos

    Tags: Bollywood, Entertainment, Ranveer sigh