मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'83' च्या रिलीजपूर्वी दीपिका पादुकोणनं सिद्धिविनायक मंदिरात जाऊन घेतलं बाप्पाचं दर्शन! ट्रॅडिशनल ड्रेसमधील VIDEO आला समोर

'83' च्या रिलीजपूर्वी दीपिका पादुकोणनं सिद्धिविनायक मंदिरात जाऊन घेतलं बाप्पाचं दर्शन! ट्रॅडिशनल ड्रेसमधील VIDEO आला समोर

बॉलिवूड   (Bollywood)   अभिनेता रणवीर सिंह  (Ranveer Singh)  आणि दीपिका पादुकोण  (Deepika Padukone)  स्टारर स्पोर्ट्स ड्रामा '83'   (83 Movie Release)  आज थिएटरमध्ये रिलीज झाला आहे.

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि दीपिका पादुकोण (Deepika Padukone) स्टारर स्पोर्ट्स ड्रामा '83' (83 Movie Release) आज थिएटरमध्ये रिलीज झाला आहे.

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि दीपिका पादुकोण (Deepika Padukone) स्टारर स्पोर्ट्स ड्रामा '83' (83 Movie Release) आज थिएटरमध्ये रिलीज झाला आहे.

मुंबई,24 डिसेंबर-   बॉलिवूड   (Bollywood)   अभिनेता रणवीर सिंह  (Ranveer Singh)  आणि दीपिका पादुकोण  (Deepika Padukone)  स्टारर स्पोर्ट्स ड्रामा '83'   (83 Movie Release)  आज थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. कबीर खान यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. हा चित्रपट कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली 1983 च्या क्रिकेट विश्वचषकात भारताच्या विजयावर आधारित आहे. जेव्हा भारतीय संघाने अंतिम फेरीत वेस्ट इंडिजचा पराभव करून पहिला विश्वचषक जिंकला होता. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी, दीपिका पादुकोण चित्रपटासाठी प्रार्थना करण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिराला भेट देताना दिसली.

दीपिका पादुकोणही या चित्रपटाची सह-निर्माती आहे. दीपिका पादुकोणनं गणपीत बाप्पाच्या दर्शनासाठी गुलाबी रंगाचा एथनिक पोशाख परिधान केला होता. अभिनेत्रीनं तोंडाला मास्क लावला होता. गुलाबी रंगाच्या आउटफिटमध्ये दीपिका खूपच सुंदर दिसत होती. मास्क असला तरी चाहत्यांनी तिला ओळखलं. त्यानंतर ते  दीपिकाला चिअर करू लागला. तेथे उपस्थित असलेल्या पापाराझींनीही तिचे फोटो आणि व्हिडिओ काढण्यास सुरुवात केली.

याआधी बुधवारी संध्याकाळी '83' या चित्रपटाचा भव्य प्रीमियर मुंबईत पार पडला. रणवीर सिंहनं प्रीमियरमध्ये पांढऱ्या रंगाच्या पोशाखात स्टायलिश एन्ट्री केली होती. रणवीर पांढऱ्या रंगाच्या टक्सिडोमध्ये अतिशय हँडसम  दिसत होता.  जो त्यानं  उबर-कूल शेड्ससोबत कॅरी केला  होता. रणवीरनं  पापाराझींना हात जोडून अभिवादन केलं करत  दिग्दर्शक कबीर खान यांच्यासोबत पोझ देखील दिली होती.  यावेळी त्यानं कबीरला घट्ट मिठीही मारली होती.

या भव्य प्रीमियर दरम्यान, कपिल देव देखील फारच आनंदी दिसत होते. त्यांनी  रणवीर सिंहसोबत अनेक सुंदर पोज  दिल्या. त्याचवेळी दीपिका पादुकोणनं  शोमध्ये डायमंड नेकपीससह जबरदस्त स्ट्रॅपलेस गाऊनमध्ये सर्वांचं  लक्ष वेधून घेतलं होतं. रणवीर आणि दीपिकानं रेड कार्पेटवर काही भावनिक क्षणही शेअर केले. त्यांनी पापाराझींसाठी एकत्र पोज दिली. रणवीर सिंहची 'गली बॉय' को-स्टार आलिया भट्टनेही '83' स्क्रिनिंगला हजेरी लावली होती.

(हे वाचा:'83' च्या प्रीमियरमध्ये ब्लॅक गाउनमध्ये दीपिकाचा जलवा; थोड्याच वेळात बदलला ड्रेस)

83स्टार कास्ट-

'83' मध्ये रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोणसोबत पंकज त्रिपाठी, ताहिर राज भसीन, आदिनाथ कोठारे,जीवा, साकिब सलीम, जतिन सरना, चिराग पाटील, दिनकर शर्मा, निशांत दहिया, हार्डी संधू, साहिल खट्टर, एमी विर्क,  धैर्य करवा आणि आर बद्री हे कलाकार आहेत.

First published:
top videos

    Tags: Deepika padukone, Entertainment, Ranveer sigh