जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Ranveer singh : रणवीर सिंगच्या 3 कोटी 90 लाखांच्या कारने केलं वाहतूक नियमांचं उल्लंघन; काय आहे सत्य?

Ranveer singh : रणवीर सिंगच्या 3 कोटी 90 लाखांच्या कारने केलं वाहतूक नियमांचं उल्लंघन; काय आहे सत्य?

रणवीर सिंग

रणवीर सिंग

नेटकऱ्यांचा दावा आहे की अभिनेता ज्या कारमध्ये प्रवास करत आहे त्या कारचा परवाना रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाईची मागणी होत आहे. पण सोशल मीडिया यूजर्सच्या या दाव्यांमध्ये कितपत तथ्य आहे ते जाणुन घ्या.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 18 ऑक्टोबर : रणवीर सिंग त्याच्या फॅशन सेन्ससाठी खूप लोकप्रिय आहे. तो अनेकदा त्याच्या अजब कपड्यांमुळे चाहत्यांची मने जिंकतो पण काही वेळा ट्रोल  देखील होतो. पण सध्या तो वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग सध्या ट्रॅफिक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे खूप ट्रोल होत आहे. काही वेळापूर्वी अभिनेत्याने 3.9 कोटी रुपयांची अॅस्टन मार्टिन कार खरेदी केली होती. अलीकडेच तो मुंबई विमानतळावर या कारमध्ये दिसला होता. लोकांचा दावा आहे की अभिनेता ज्या कारमध्ये प्रवास करत आहे त्या कारचा परवाना रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाईची मागणी होत आहे. पण सोशल मीडिया यूजर्सच्या या दाव्यांमध्ये कितपत तथ्य आहे ते आम्ही तुम्हाला सांगतो. रणवीर सिंग या कारबाबत वादात सापडला आहे. कारण  या कारचा विमा संपल्यानंतरही रणवीर ती रस्त्यावर चालवताना दिसला त्यामुळे तो ट्रोल  होत आहे.  सोशल मीडियावर एका युजरने ट्विटद्वारे मुंबई पोलिसांना याची माहिती दिली. रणवीर सिंगचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच लोकांनी त्याच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. स्क्रीनशॉट शेअर करताना एका ट्विटर युजरने लिहिले की, ‘मुंबई पोलीस रणवीर सिंगवर कडक कारवाई करत आहेत. तो विम्याशिवाय गाडी चालवत होता. वापरकर्त्याच्या मते, या अभिनेत्याच्या कारचा विमा 28 जून 2020 रोजी संपला होता. ही कार चालवून अभिनेत्याने वाहतूक नियमांचे उल्लंघन केले आहे. अशा परिस्थितीत त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी. हेही वाचा - The Kashmir Files 2: ‘द काश्मीर फाइल्स 2’ येणार भेटीला; विवेक अग्निहोत्रीनीं दिली मोठी माहिती मात्र, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली बातमी पूर्णपणे खोटी आहे. रणवीर सिंगच्या या कारचा विमा अद्याप संपलेला नाही. माहितीनुसार, अभिनेत्याच्या या वाहनाचा 2 जुलै 2022 रोजी विमा उतरवण्यात आला होता आणि तो 1 जुलै 2023 पर्यंत सुरू राहील. म्हणजेच, अभिनेत्याने कोणत्याही प्रकारच्या वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केलेले नाही.

News18

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर रणवीर लवकरच अभिनेत्री आलिया भट्टसोबत ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्ये दिसणार आहे. करण जोहर दिग्दर्शित या चित्रपटात आलिया आणि रणवीर व्यतिरिक्त अभिनेता धर्मेंद्र, शबाना आझमी, प्रीती झिंटी आणि जया बच्चन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. करण जोहर, हिरू जोहर आणि अपूर्व मेहता दिग्दर्शित हा चित्रपट पुढील वर्षी बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार आहे. याशिवाय रणवीर सिंह रोहित शेट्टीच्या ‘सर्कस’ या चित्रपटातही दिसणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात