मुंबई, 9 सप्टेंबर- गेल्या 10 दिवसांत देशभरात गणेशोत्सवाची धूम दिसून आली. महाराष्ट्रात हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. आज बाप्पाचं विसर्जन होत असलं. तरी या 10 दिवसांत सर्वसामान्य लोकांपासून मोठमोठ्या सेलिब्रेटींपर्यंत सर्वांनीच ठिकठिकाणी जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलं आहे. नुकतंच अभिनेता रणवीर सिंह, दीपिका पादुकोण आणि सारा अली खान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी बाप्पाच्या दर्शनासाठी पोहोचले होते. महाराष्ट्रात गणेशोत्सवात घरोघरी बाप्पा विराजमान होतो. या दहा दिवसांत गणरायाची मनोभावे सेवा केली जाते. सर्वसामान्य लोकांपासून ते सेलेब्रेटींपर्यंत सर्वजण मोठ्या उत्सहात हा सण साजरा करतात. सोबतच सेलिब्रेटी ठिकठिकाणी जाऊन बाप्पाचं दर्शन घेतात. महारष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घरीसुद्धा बाप्पा विराजमान झाला आहे. अनेक क्षेत्रातील दिग्गज याठिकाणी दर्शनासाठी येत आहेत.
Deepika Padukone and Ranveer Singh today with CM Eknath Shinde at his residence for ganesh darshan ❤️ pic.twitter.com/bdscpfawZq
— Deepika Files (@FilesDeepika) September 8, 2022
नुकतंच बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंहने मुख्यमंत्र्यांच्या घरी गणेश दर्शनासाठी उपस्थिती लावली होती. यावेळी अभिनेत्री सारा अली खानसुद्धा उपस्थित होती. या तिघांचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. यामध्ये तिन्ही सेलिब्रेटी राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधताना दिसून येत आहेत. विरल भयानी आणि काही फॅन पेजने हे व्हिडीओ आणि फोटो शेअर केले आहेत.
**(हे वाचा:** ‘धर्मवीर’ फेम प्रसाद ओक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला, काय आहे कारण? ) यावेळी अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह पारंपरिक अंदाजात दिसून आले. दीपिकाने मोठ्या बनारसी दुपट्ट्याचा चुडीदार परिधान केला होता. तर सारा अली खान पिवळ्या रंगाच्या चुडीदारमध्ये दिसून आली.