मुंबई, 3 फेब्रुवारी- एमटीव्ही रोडीजला (MTV Rodies) 19 वर्षे झाले आहेत. हा शो आणि रणविजय सिंह याचे खास कनेक्सन आहे. सुरूवातीपासून रणविजय सिंह या शोसोबत जोडला गेला आहे. पहिल्यांदा स्पर्धक म्हणून नंतर होस्ट म्हणून तो या शोसोबत नेहमीच कनेक्टमध्ये राहिला आहे. आता अशी चर्चा आहे की, या शोमध्ये रणविजय सिंह दिसणार नाही. मात्र तो काही काळासाठी या शोमध्ये दिसणार नाही की, कायस्वरूपी दिसणार नाही याविषयी ठोस माहिती मिळू शकलेली नाही. अशा स्थितीमध्ये सर्वांना प्रश्न पडला आहे की, आता एमटीव्ही रोडीजचा नवीन होस्ट कोण असणार ? रणविजय सिंहची जागा घेणार हा बॉलिवूड अभिनेता एमटीव्ही रोडीज (MTV Rodies) एक थ्रिलने भरलेला रिअॅलिटी शो आहे. रणविजयच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. इतून पुढे तो हा शो होस्ट करताना दिसणार नाही. त्याच्या जागी बॉलिवूड अभिनेता MTV Rodies सीजन 18 होस्ट करताना दिसणार आहे. News 18 ला शोसी संबंधीत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘प्रत्येक सीजनप्रमाणे एमटीव्हीच्या या सीजनमध्येही खूप थ्रील पाहायला मिळणार आहे. पण यावेळी होस्ट नवीन असणार आहे. नवीन होस्ट MTV रोडीजच्या आगामी सीजन 18 मध्ये दिसणार आहे. नवा होस्ट हा बॉलीवूडमधील असाच एक अभिनेता आहे जो आपल्या एनर्जीसाठी ओळखला जातो. या शोची जर्नी लवकरच सुरू होणार असून चाहत्यांना सरप्राईज मिळणार आहे. नवीन होस्ट कोण आहे याचा लवकरच खुलासा करण्यात येणार आहे. वाचा- मधुबाला यांच्या बहिणीबद्दल समोर आली शॉकिंग न्यूज! सुनेनं घरातून बाहेर… सोनू सूद MTV Rodies नवा होस्ट? एचटीच्या बातमीनुसार, रणविजयच्या जागी एमटीव्ही 18 सोनू सूद होस्ट करताना दिसणार आहे. शोच्या निर्मात्यांनी शोमध्ये काहीसे बदल केले आहेत. गॅंग लीजर्सची कनस्पेट यावेळी शोमध्ये पाहायल मिळणार नाही. शो होस्ट करण्यासोबत सोनू सूद शोचा मेंटर देखील असणार आहे. अशी चर्चा आहे की, नेहा धूपिया, प्रिंस नरुला यांच्यासोबत अन्य लोक देखील दिसणार आहेत. वाचा- शशांक केतकरच्या Workout चा व्हिडिओ व्हायरल, कशासाठी नेमकी तयारी? ‘शार्क टॅंक इंडिया’ सोबत रणविजय सिंह मीडिया रिपोर्टनुसार, रणविजय सिंहने हा सोडण्यामागचे कारण म्हणजे त्याच्या तारखांचा मेळ बसेना. त्यामुळेच त्याने हा निर्णय घेतला आहे. यासोबत चॅनेलसोबत खटकल्याच्या बातम्या देखील त्याने फेटाळल्या आहेत. रणविजय टीव्हीच्या पहिल्या बिझनेस शो ‘शार्क टॅंक इंडिया’ सोबत काम करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.