जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / VIDEO: कार्तिकनं भाच्याला नेलं बागा बीचला! मामा-भाच्याची विकेंड हॉर्स राईड एकदा पाहाच

VIDEO: कार्तिकनं भाच्याला नेलं बागा बीचला! मामा-भाच्याची विकेंड हॉर्स राईड एकदा पाहाच

VIDEO: कार्तिकनं भाच्याला नेलं बागा बीचला! मामा-भाच्याची विकेंड हॉर्स राईड एकदा पाहाच

VIDEO: कार्तिकनं भाच्याला नेलं बागा बीचला! मामा-भाच्याची विकेंड हॉर्स राईड एकदा पाहाच

कलाकार पडद्यावर जितकी धम्माल मस्ती करतात. तितकीच मस्ती ते आपल्या वैयक्तिक आयुष्यातही करत असतात. कलाकारांना शुटींगमुळे बऱ्याचदा घरी जाता येत नाही. मराठीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांच्या घरी त्यांची छोटी मुलं, भाचे त्यांची वाट पाहत असतात.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 21 जून:  कलाकार पडद्यावर जितकी धम्माल मस्ती करतात. तितकीच मस्ती ते आपल्या वैयक्तिक आयुष्यातही करत असतात. कलाकारांना शुटींगमुळे बऱ्याचदा घरी जाता येत नाही. मराठीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांच्या घरी त्यांची छोटी मुलं, भाचे त्यांची वाट पाहत असतात. त्यामुळे ते कलाकारही घरी जाऊन आपल्या पिल्लाबरोबर खेळण्यासाठी वाट पाहत असतात. असाच एक अभिनेता म्हणजे आशुतोष गोखले (  Ashutosh Gokhale New Video) म्हणजे रंग माझा वेगळा ( Rang Majha Vegla) मालिकेतील कार्तिक ( Kartik). आशुतोषलाही एक छोटा भाचा आहे. तो नेहमीच त्याचा भाचा अबीर ( Abir) बरोबर धम्माल मस्ती करत असतो. अनेक व्हिडीओ देखील तो सतत शेअर करत असतो. मात्र यावेळी अभिनेत्याने आपल्या भाच्यासोबतचा व्हिडीओ शेअर केला आहे. नुकतीच आशुतोषनं भाच्याबरोबर धम्माल अशी विकेंट हॉर्स राईड केली. त्याचा एक कमाल व्हिडीओ त्यानं शेअर केला आहे. आशुतोषनं भाच्याबरोबर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात भाचा आशुतोषच्या पाठीवर बसला आहे आणि आशुतोष त्याचा घोडा बनला आहे. दोघांची ही विकेंड हॉर्स राईड थेट जाऊन मग गोव्याच्या बागा बिचवर पोहोचली. दोघांचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये आशुतोष भाचाला विचारतो,‘काय मग कुठे जायचयं?’, तेव्हा  भाचा त्याच्या बोबड्या बोलात ‘बागा बीचला’ जायचयं असं म्हणतो. मग मामाच्या पाठीवर बसून  थेट बागा बीचला पोहोचतो. दोघेही या राईडमध्ये खूप हसताना आणि मज्जा करताना दिसत आहेत.

जाहिरात

हेही वाचा - Jitendra Joshi: जितेंद्र जोशीनं घेतलं तुकोबांच्या पालखीचं घेतलं दर्शन अन् आली आजीची आठवण, म्हणाला… आशुतोषनं शेअर केलेला हा व्हिडीओ पाहून अनेकांना त्यांच्या लहानपणीची आठवण झाली आहे. तर आशुतोषच्या अनेक सहकलाकारांनी कौतुक केलं आहे.  हृतानं क्यूट म्हणत, ‘अरे बागा बीचला जायचंय’, असं म्हटलंय. तर अभिनेत्री विदीशा मस्करनं ‘भागा बिच, पोराची लक्षणं ठिक दिसतायत’. तर एका युझरनं म्हटलंय, ‘अरे किती गोड बागा बीचला घोड्यावरुन जायचंय, आता पासूनच चॉईस चांगली आहे. थेट गोव्याला जायचं आहे’. आशुतोष नेहमीच अबीरबरोबरचे  भाच्याबरोबरचे  फोटो आणि मजेशीर व्हिडीओ शेअर करत असतो. दोघांच्या व्हिडीओला चाहत्यांची नेहमीच पसंती मिळाली आहे. आशुतोष रंग माझा वेगळा मालिकेच्या शुटींगमध्ये व्यस्त असला तरी तो अबीरला पुरेसा वेळ देतो. अभिनेता आशुतोष गोखले हा मालिकेसह दादा एक गुड न्यूज आहे या नाटकातही काम करतोय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात