मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Ranbir Kapoor च्या 'त्या' कृतीनं जिंकलं चाहत्यांचं मन, होतोय कौतुकाचा वर्षाव

Ranbir Kapoor च्या 'त्या' कृतीनं जिंकलं चाहत्यांचं मन, होतोय कौतुकाचा वर्षाव

अभिनेता रणबीर कपूर गेल्या काही दिवसांपासून त्याचा आगामी चित्रपट 'ब्रम्हास्त्र' च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. रणबीर कपूर या चित्रपटाच्या प्रमोशसाठी नुकताच चेन्नईला गेला होता.

अभिनेता रणबीर कपूर गेल्या काही दिवसांपासून त्याचा आगामी चित्रपट 'ब्रम्हास्त्र' च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. रणबीर कपूर या चित्रपटाच्या प्रमोशसाठी नुकताच चेन्नईला गेला होता.

अभिनेता रणबीर कपूर गेल्या काही दिवसांपासून त्याचा आगामी चित्रपट 'ब्रम्हास्त्र' च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. रणबीर कपूर या चित्रपटाच्या प्रमोशसाठी नुकताच चेन्नईला गेला होता.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 26 ऑगस्ट : अभिनेता रणबीर कपूर गेल्या काही दिवसांपासून त्याचा आगामी चित्रपट 'ब्रम्हास्त्र' च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. रणबीर कपूर या चित्रपटाच्या प्रमोशसाठी नुकताच चेन्नईला गेला होता. यावेळी त्याच्यासोबत दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुन आणि प्रसिद्ध दिग्दर्शक एस एस राजामौलीदेखील पहायला मिळाले. यावेळीचा त्या तिघांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये रणबीरनं केलेल्या कृतीमुळे सध्या त्याच्यावर कौतुकांचा वर्षाव होताना दिसतोय.

बॉयकॉटच्या ट्रेंडमध्ये रणबीर कपूरचा 'ब्रम्हास्त्र' देखील अडकला आहे. यातच रणबीरचा नवा व्हिडीओ समोर आल्यानं त्याच्यावर कौतुकांचा वर्षाव होतोय. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये रणबीर एसएस राजमौली आणि नागार्जुन यांच्या पायांना स्पर्श करताना आणि त्यांचे आशीर्वाद घेताना दिसत आहे. रणबीरच्या अशा वागण्यामुळे नेटकरी त्याच्यावर चांगलेच प्रभावित झाल्याचं दिसतंय. सोशल मीडियावर सध्या रणबीरच्या या वागण्याचं कौतुक केलं जातंय.

View this post on Instagram

A post shared by Pinkvilla (@pinkvilla)

चेन्नईमध्ये झालेल्या 'ब्रम्हास्त्र' प्रमोशन इव्हेटच्या वेळी रणबीर कपूर, नागार्जुन, एस एस राजामौली यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं आहे. सोबतच त्या तिघांनी दक्षिण भारतीय जेवणाचा आस्वाद घेतला. तो व्हिडीओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. चाहत्यांना यावेळीचा रणबीर जास्त भावल्याचं दिसून आलं.

हेही वाचा -  Liger Collection: नकारात्मक रिव्ह्यू मिळूनही बॉक्स ऑफिसवर लायगरची गाडी सुसाट; समोर आलं फर्स्ट डे कलेक्शन

दरम्यान, 9 सप्टेंबरला ब्रम्हास्त्र चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हिंदीसोबत तेलगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहे. त्यामुळे या चित्रपटासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. शिवाय या चित्रपटात सर्वांची लाडकी आणि लोकप्रिय अभिनेत्री आलियाही दिसणार आहे. 'ब्रह्मास्त्र'मधून नागार्जुन दोन दशकांनंतर हिंदी सिनेमात पुनरागमन करत आहे. त्यामुळे त्याचे चाहतेही खूप आनंदी आहेत.

First published:
top videos

    Tags: Alia Bhatt, Bollywood, Chennai, Ranbir kapoor, Social media, South film, Upcoming movie