दीपिकाच्या मुलांबद्दल असं काही बोलला एक्स बॉयफ्रेंड रणबीर की, चकीत झाला रणवीर सिंह

दीपिकाच्या मुलांबद्दल असं काही बोलला एक्स बॉयफ्रेंड रणबीर की, चकीत झाला रणवीर सिंह

रणवीर आणि रणबीर यांनी करण जोहरच्या टॉक शोमध्ये एकत्र हजेरी लावली होती. या शोमध्ये त्यांच्यात धम्माल केमिस्ट्री पाहायला मिळाली.

  • Share this:

मुंबई, 9 जून : दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह हे बॉलिवूडमधील सर्वात हॉट कपल मानलं जातं. कोणतही अवॉर्ड फंक्शन असो वा पार्टी या ठिकाणी दीपवीरच्या लुकपासून ते स्टाइलपर्यंत प्रत्येक गोष्टीची चर्चा होते. लग्नाआधी असलेली या कपलची क्रेझ त्यांच्या लग्नानंतरही कमी झालेली नाही. अर्थात हे तर सर्वांनाच माहित आहे की, रणवीरला डेट करण्याआधी दीपिका पदुकोण रणबीर कपूरला डेट करत होती. त्यांच्या नात्याची चर्चा सुद्धा झाली होती आणि मग ब्रेकअपही झालं. त्यानंतर एकमेकांना 6 वर्ष डेट केल्यावर 2018 मध्ये दीपिका-रणवीर लग्नाच्या बेडीत अडकले. पण एक मुलाखतीत रणबीर कपूरनं दीपवीरच्या मुलांबाबत असं काही वक्तव्य केलं जे ऐकल्यावर रणवीर सुद्धा चकित झाला.

दीपिका आणि रणवीर सिंह यांची मैत्री रामलीला सिनेमाच्या शूटिंगच्या वेळी झाली आणि त्यांच्यात जवळीक वाढत गेली आणि ही मैत्री प्रेमात बदलली. पण रणवीरच्या आधी दीपिका रणबीर कपूरला डेट करत होती. 2016 मध्ये रणवीर आणि रणबीर यांनी करण जोहरच्या टॉक शोमध्ये एकत्र हजेरी लावली होती. या दोघांमध्ये एक भूतकाळाचं कनेक्शन असतानाही या शोमध्ये त्यांच्यात धम्माल केमिस्ट्री पाहायला मिळाली. कोणताही हेवा-दावा न ठेवता या दोघांनी या शोमध्ये धम्माल गप्पा मारल्या. यावेळी रणबीर दीपिका आणि रणवीरच्या बॉन्डिंग बद्दल भरभरून बोलला.

राजेश खन्नांच्या गाण्यावर स्वतःला रोखू शकल्या नाहीत डिंपल, पाहा डान्स Video

View this post on Instagram

❤️

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

करण जोहरच्या टॉक शोमध्ये रणवीर-दीपिकाच्या केमिस्ट्री बद्दल बोलताना रणबीर म्हणाला, ‘या दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री खूपच अमेझिंग आहे. ते एकमेकांचं कौतुक करतात. मी त्यांच्यासाठी खूप आनंदी आहे. मला वाटतं की त्यांनी असंच नेहमी खूश राहावं. लवकर लग्न करावं त्यांची क्यूट मुलं असावीत आणि त्यांचा आवडता अभिनेता रणबीर कपूर असावा.’

अभिनेता चिरंजीवी सरजा यांचं 2 वर्षांपूर्वीच झालं होतं लग्न, पत्नी आहे प्रेग्नन्ट

View this post on Instagram

jab naina met bunny...❤️ @manishmalhotra05

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

रणबीर कपूरचं हे बोलणं एकूण स्वतः रणवीर सिंह सुद्धा चकीत झाला होता. त्यांचा हा एपिसोड त्यावेळी खूपच हिट राहिला होता. रणवीर-दीपिकाच्या लग्नाला आता जवळपास दीड वर्ष उलटून गेलं आहे. मध्यंतरीच्या काळात दीपिकाच्या प्रेग्नन्सीच्या चर्चाही झाल्या मात्र नंतर त्या सर्व अफवा असल्याचंही समोर आलं होतं. रणबीर बद्दल बोलायचं तर तो सध्या आलिया भटसोबत रिलेशनशिपमध्ये आहे आणि हे दोघं लवकरच लग्न करणार असल्याचंही बोललं जात आहे.

लॉकडाऊनमध्ये रसिका सुनीलनं केलं BOLD फोटोशूट, हॉट लुकवर चाहते फिदा

First published: June 9, 2020, 12:48 PM IST

ताज्या बातम्या