जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / रणबीर कपूर-श्रद्धा कपूर सिनेमाच्या सेटवर आग; एकाचा मृत्यू, घटनेचा भीषण video व्हायरल

रणबीर कपूर-श्रद्धा कपूर सिनेमाच्या सेटवर आग; एकाचा मृत्यू, घटनेचा भीषण video व्हायरल

Ranbir Kapoor-Shraddha Kapoor movie Set fire video viral

Ranbir Kapoor-Shraddha Kapoor movie Set fire video viral

रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर (ranbir kapoor and sharaddha kapoor film set fire)यांच्या आगामी चित्रपटाच्या सेटवर शुक्रवारी संध्याकाळी भीषण आग लागल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. पाहा VIDEO

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 30 जुलै : बॉलिवूडचा ‘चॉकलेट बॉय’ अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर लवकरच एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर (ranbir kapoor and sharaddha kapoor  film set fire)यांच्या आगामी चित्रपटाच्या सेटवर शुक्रवारी संध्याकाळी भीषण आग लागल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील चित्रकूट स्टुडिओमध्ये ही घटना घडली. या स्टुडिओला आग लागल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. मुंबईतील अंधेरी पश्चिम भागात असलेल्या चित्रकुट या स्टुडिओला आग लागल्यानंतर लगेच अग्निशामक दलाला बोलावण्यात आलं. त्यानंतर ही आग आटोक्यात आली. स्टुडिओला लागलेल्या आगीच्या व्हिडीओमध्ये दिसतंय की, भीषण आग लागली असून सगळीकडे काळा धुर मोठ्या प्रमाणावर पसरत आहे. या लागलेल्या आगीत 32 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. याची माहिती कूपर रुग्णालयाचे डॉक्टर सदाफुले यांनी दिली. हेही वाचा -  Rasik Dave Death: अभिनेते रसिक दवे यांचं दुःखद निधन, वयाच्या 65 व्या वर्षी घेतला अखेचा श्वास चित्रकूट स्टुडिओमध्ये सायंकाळी 4.30 वाजता ही आग लागली होती. त्यानंतर अग्निशामक दलाला बोलावण्यात आले आणि  रात्री 10.35 पर्यंत आग आटोक्यात आणण्यात आली. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग विझवण्याचे काम सुरू करण्यात आलं. त्यामुळे सेटवर जास्त नुकसान झालं नसल्याचं म्हटलं जातंय.

जाहिरात

रणबीर आणि श्रद्धाच्या आगामी चित्रपटाचं गाणं शूट करण्यासाठी सेट बनवण्यात आला होता. त्यामुळे आता आठवडाभरानंतर हे गाणं शूट केलं जाणार असल्याचं म्हटलं जातंय. लव रंजनच्या या अनटाइटल्ड चित्रपटात श्रद्धा कपूर आणि रणबीर कपूर पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. चित्रपटाचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही, परंतु शूट आणि त्याच्या सेटमधील अनेक छायाचित्रे आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असताना दिसत आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यनंही पाहुण्या भूमिकेत दिसणार असल्याच्या चर्चा आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात