मुंबई, 02 जुलै : रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल’ या चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. या चित्रपटाचा टिझर काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तेव्हापासूनच रणबीरच्या लूकची चर्चा सुरु आहे. हा चित्रपट कधी रिलीज होणार यासाठी प्रेक्षक उत्सुक असताना आता मोठी बातमी समोर येत आहे. बॉक्स ऑफिसवर ‘गदर 2’ आणि ‘OMG 2’ सोबत टक्कर देणारा हा चित्रपट 11 ऑगस्टला रिलीज होणार होता. पण सनी देओल आणि अक्षय कुमार यांच्यासमोर रणबीर कपूरच्या चित्रपटाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात होती, त्यामुळेच आता निर्मात्यांनी या चित्रपटाबाबतीत मोठा निर्णय घेतला आहे. संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित ‘अॅनिमल’ हा चित्रपट आता 1 डिसेंबर 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात रणबीर कपूरशिवाय बॉबी देओल, रश्मिका मंदान्ना आणि अनिल कपूर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाचे व्हीएफएक्स अजून बरेच काम बाकी असल्याने प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. दिग्दर्शकाला चित्रपट अधिक दर्शनीय बनवायचा आहे. चित्रपटाचे अॅक्शन सीक्वेन्स एकदम दमदार बनवायचे आहेत. पण निर्मात्यांच्या म्हणण्यानुसार हे सगळं काम ऑगस्टपूर्वी पूर्ण होणार नाही, त्यामुळे रणबीरसह निर्मात्यांनी रिलीज पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
मात्र, आता ‘गदर 2’ आणि ‘ओएमजी 2’ सोबत ‘अॅनिमल’ची टक्कर टाळण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. Bigg Boss OTT 2: ‘मी इथून जातोय…’ जेडी आणि आकांक्षा मध्ये झालेल्या ‘त्या’ किसिंग वरून भडकला सलमान खान ‘अॅनिमल’ हा चित्रपट डिसेंबरमध्ये सलमान खान-कतरिना कैफच्या ‘टायगर 3’ला टक्कर देईल काय अशी चर्चा होती. मात्र हा आता रिलीजच्या 3 आठवडे आधी प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षक ‘टायगर 3’ च्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत, ज्यामध्ये शाहरुख खानच्या कॅमिओने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. ख्रिसमसच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणाऱ्या राजकुमार हिरानी यांच्या ‘डंकी’ चित्रपटातूनही ‘अॅनिमल’ला आव्हान मिळणार नाही. अभिनेता रणबीर कपूर आणि लेखक-दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांचा हा सिनेमा आहे. या सिनेमात रणबीरचा ऍक्शन अवतार पाहायला मिळणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विविध कारणामुळे हा चित्रपट चर्चेत होते. या चित्रपटाच्या या प्री-टीझरला प्रेक्षक दणदणित प्रतिसाद देत आहेत. ‘कबीर सिंग’ फेम दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित ‘अॅनिमल’ मध्ये रश्मिका मंदान्ना, अनिल कपूर आणि बॉबी देओल देखील दिसणार आहेत. प्रत्येकजण या चित्रपटाबद्दल खूप उत्सुक आहे. रश्मिका मंदान्ना आणि रणबीर पहिल्यांदाच या चित्रपटातून एकत्र काम करताना दिसणार आहेत. या चित्रपटाची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे. या चित्रपटात जबरदस्त अॅक्शन पाहायला मिळणार असल्याचं बोललं जात आहे.