मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

HBD: ब्रेकअपनंतर दीपिका पादुकोणसोबत 'तमाशा' करणं रणबीर कपूरसाठी होतं फारच कठीण

HBD: ब्रेकअपनंतर दीपिका पादुकोणसोबत 'तमाशा' करणं रणबीर कपूरसाठी होतं फारच कठीण

बॉलिवूडचा (Bollywood) चॉकलेट बॉय म्हणून अभिनेता रणबीर कपूरला (Ranbir Kapoor) ओळखलं जात. रणबीरने अनेक रोमँटिक चित्रपट देत तरुणीनां आपलं वेड लावलं आहे.

बॉलिवूडचा (Bollywood) चॉकलेट बॉय म्हणून अभिनेता रणबीर कपूरला (Ranbir Kapoor) ओळखलं जात. रणबीरने अनेक रोमँटिक चित्रपट देत तरुणीनां आपलं वेड लावलं आहे.

बॉलिवूडचा (Bollywood) चॉकलेट बॉय म्हणून अभिनेता रणबीर कपूरला (Ranbir Kapoor) ओळखलं जात. रणबीरने अनेक रोमँटिक चित्रपट देत तरुणीनां आपलं वेड लावलं आहे.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई,28 सप्टेंबर- बॉलिवूडचा (Bollywood) चॉकलेट बॉय म्हणून अभिनेता रणबीर कपूरला (Ranbir Kapoor) ओळखलं जात. रणबीरने अनेक रोमँटिक चित्रपट देत तरुणीनां आपलं वेड लावलं आहे. आज हा अभिनेता आपला ३९ वा वाढदिवस (Birthday Today) साजरा करत आहे. यानिमित्ताने त्याच्या काही खास गोष्टींवर एक नजर टाकूया.

अभिनेता रणबीर कपूरचा जन्म २८ सप्टेंबर १९८२ मध्ये मुंबई येथे झाला होता. ज्येष्ठ अभिनेता ऋषी कपूर आणि अभिनेत्री नीतू सिंग यांचा तो मुलगा आहे. तसेच रणबीर कपूरला एक बहीणही आहे तिचं नाव रिद्धिमा असं आहे. रणबीरचा जन्म कपूर कुटुंबात झाल्यामुळे अभिनयाचा वारसा त्याला जन्मजात मिळाला आहे.रणबीर कपूरने आपलं करिअर अभिनेता म्हणून नव्हे तर संजय लीला भन्साळी यांच्यासोबत सह्हायक दिग्दर्शक म्हणून सुरु केलं होतं. तसेच सुरुवातीला रणबीरने दोन लघुचित्रपटसुद्धा केले होते. त्यांनतर रणबीरने बॉलिवूडमध्ये एंट्री केली होती. अनिल कपूरची मुलगी सोनम कपूरसोबत 'सावरिया' या चित्रपटातुन त्याने आपलं अभिनय सुरु केलं होतं. सोनमचादेखील हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट जरी तितकाच कमाल दाखवू शकला नसला तरी त्यातील गाण्यांनी सर्वांना वेड लावलं होतं. त्यांनंतर मात्र रणबीरने अनेक हिट चित्रपट दिले आहेत.

( हे वाचा:तुषार कपूरचा शर्टलेस PHOTO पाहून नेटकरी म्हणाले, 'म्हातारा झालास')

अभिनेता रणबीर कपूरच्या लव्ह लाईफचीदेखील बरीच चर्चा झाली होती. त्याच नाव अनेक अभिनेत्रीसोबत जोडलं गेलं. मात्र दीपिका पादुकोणसोबत त्याची लव्हस्टोरी सर्वांनाच पसंत पडली होती. या जोडीला चाहत्यांचं भरभरून प्रेम मिळत असे. अनेकांना हे दोघे लग्न करतील असा विश्वासही होता. मात्र दुर्दैवाने या दोघांचं रिलेशनशिप काही वर्षांनी संपुष्टात आलं. या दोघांनी ब्रेकअप केला. दीपिकाने अनेकवेळा हा काळ आपल्यासाठी खूप कठीण असल्याचं सांगितलं होतं. इतकंच नव्हे तर आपण डिप्रेशनमध्ये गेल्याचंही म्हटलं होतं. ब्रेकअपनंतर या दोघांनी 'तमाशा' हा चित्रपट केला होता. मात्र एका रिपोर्टनुसार हा चित्रपट करणं दोघांसाठीही खूप कठीण होतं.

( हे वाचा:भावा मास्क नीट घाल... भारतात परतल्यानंतर सलमान खान होतोय 'या' कारणासाठी TROll!)

या चित्रपटामधील एक गाणं अतिशय सुपरहिट ठरलं होतं. ते गाणं म्हणजे 'अगर तुम साथ हो'. हे गाणं एक ब्रेकअप सॉन्ग आहे. या दोघांचा त्यावेळी नुकताच ब्रेकअप झाला होता. त्यामुळे रणबीर आणि दीपिकाला हे गाणं शूट करणं खूपच कठीण गेलं होतं. कारण त्यांना गाण्यामध्ये इमोशन्स आणण्यासाठी त्या फ्रेजमध्ये पुन्हा जावं लागलं होतं. त्यांनतर रणबीर दीपिकासोबत जाहिरातींमध्येही झळकला होता. सध्या रणबीर कपूरचं नाव आलिया भट्टसोबत जोडलं जात. सतत ते एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसून येतात. तसेच लवकरच ते लग्न करणार असल्याच्या चर्चादेखील होत असतात.

First published:

Tags: Entertainment, Ranbir kapoor