मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /तुषार कपूरचा शर्टलेस PHOTO पाहून नेटकरी म्हणाले, 'म्हातारा झालास'; सेलिनानेही दिला सल्ला!

तुषार कपूरचा शर्टलेस PHOTO पाहून नेटकरी म्हणाले, 'म्हातारा झालास'; सेलिनानेही दिला सल्ला!

अभिनेता तुषार कपूरने इन्स्टावर (Tusshar kapoor on instagram) त्याचे दोन फोटो शेअर केले आहेत. ते सेल्फी पाहून नेटकऱ्यांनी त्याला मजबूत ट्रोल केलं. अगदी सेलिनासारख्या अभिनेत्रीनेही केली आहे कमेंट

अभिनेता तुषार कपूरने इन्स्टावर (Tusshar kapoor on instagram) त्याचे दोन फोटो शेअर केले आहेत. ते सेल्फी पाहून नेटकऱ्यांनी त्याला मजबूत ट्रोल केलं. अगदी सेलिनासारख्या अभिनेत्रीनेही केली आहे कमेंट

अभिनेता तुषार कपूरने इन्स्टावर (Tusshar kapoor on instagram) त्याचे दोन फोटो शेअर केले आहेत. ते सेल्फी पाहून नेटकऱ्यांनी त्याला मजबूत ट्रोल केलं. अगदी सेलिनासारख्या अभिनेत्रीनेही केली आहे कमेंट

मुंबई, 27 सप्टेंबर 2021 ;   बॉलिवूड अभिनेता तुषार कपूर (Tusshar Kapoor) सध्या त्याच्या काही फोटोंच्यामुळे चर्चेत आला आहे. नुकतेच त्याने सोशल मीडियावर त्याचे काही शर्टलेस फोटो शेअर केले. त्यानंतर नेटकऱ्यांनी तुषारच्या या (Tusshar Kapoor Latest Photo) फोटोवर निशाणा साधात ट्रोल करण्यास सुरूवात केली. नेटकऱ्यांसोबहत बॉलिवू़ड अभिनेत्री सेलिना जेठलीने देखील तुषारच्या या फोटावर कमेंट केली आहे. तुषारचा हा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

अभिनेता तुषार कपूरने इन्स्टावर त्याचे दोन फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना त्याने कोणतेही कॅप्शन वापरलेले नाही. शेअर केलेला सेल्फी पाहून नेटकरी त्याला म्हातारा..म्हातारा..असं म्हणून ट्रोल करत आहेत. या सगळ्यात , अभिनेत्री सेलिना जेठलीने देखील त्याची फिरकी घेत एक मजेशीर कमेंट केली आहे.. ‘हमदर्द टॉनिक सिंकारा उपाय म्हणून चांगले आहे’ अशी कमेंट सेलिनाने केली आहे.

वाचा :mazhi tuzhi reshimgaath: 'शेफाली' म्हणते 'माझ्यासाठी हा टर्निंग पॉईंट'

नेटकऱ्यांच्या कमेंट पाहता तुषारचा हा शर्टलेस फोटो त्यांना आवडला नसल्याचे दिसत आहे. त्यांनी तुषार कपूरला वयावरुन ट्रोल केले आहे. एका यूजरने ‘गुरु, तू म्हातारा झालास’ असे म्हटले. तर दुसऱ्या एका यूजरने ‘म्हातारे दिसत आहेत रामू काका’ असे म्हणत वयावरून ट्रोल केले आहे.

View this post on Instagram

A post shared by Tusshar Kapoor (@tusshark89)

तुषार कपूरने 2001 मध्ये 'मुझे कुछ कहना है' या चित्रपटाने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. या चित्रपटात करीना कपूर तुषारसोबत होती. तुषारला या चित्रपटासाठी पदार्पणातील सर्वोत्कृष्ट पुरुष अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. यानंतर तुषारने 'क्या दिल ने कहा', 'ये दिल', 'जीना ओन्ली मेरे लिये' आणि 'कुछ तो है' या चित्रपटांमध्ये काम केले, परंतु त्याचे सर्व चित्रपट एकामागून एक फ्लॉप ठरले.

अनेक चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर 2004 मध्ये तुषारच्या 'गायब' चित्रपटातील त्याच्या अभिनयाची प्रशंसा झाली. या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. त्याच्या कामाची इंडस्ट्रीमध्ये बरीच चर्चा झाली. त्यानंतर तुषारने रोहित शेट्टीच्या 'गोलमाल' चित्रपटात काम केले. जो ब्लॉकबस्टर हिट ठरला. हा चित्रपट 2006 मध्ये रिलीज झाला, तुषारने त्याच्या दोन्ही सिक्वेलमध्ये काम केले आहे. यानंतर तो चित्रपटांपासून काही वर्षे दूर राहिला. मग तो फक्त काही मोजक्या चित्रपटांमध्ये दिसला. त्यानंतर त्याने चित्रपटांची निर्मिती करण्यास सुरुवात केली.

First published:
top videos

    Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood News