मुंबई 22 ऑगस्ट : प्रोड्यूसर मधु मंटेना (Madhu Mantena) यांचा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट ‘रामायण’ (Ramayan) लवकरच फ्लोअरवर जाणार आहे. तर प्रेक्षकांमध्ये आतापासूनच याविषयी उत्सुकता पाहायला मिळत आहे. दरम्यान आता चर्चा आहे की अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) रावणाच्या भुमिकेत दिसणार आहे. रिपोर्ट्स नुसार हृतिक यात रावणाच्या भूमिकेसाठी फारच उत्सुक आहे. दरम्यान या वेब सीरिजची (Web Series) सध्या सुरूवातीची चर्चा सुरू आहे. स्पॉटबॉयने दिलेल्या वृत्तानुसार अजून या बेवसीरिजविषयी कोणतीही गोष्ट पक्की झालेली नाही. पण याच सीरिजमध्ये अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) श्रीराम यांची भूमिका साकरणार असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान याबाबत अद्याप काहीच निश्चीत झालं नाही. तर कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
एक सुत्राने दिलेल्या माहिती नुसार, अद्याप रणबीरला कोणातीही विचारणा करण्यात आली नाही. व या बातम्या खोट्या असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे अद्याप रणबीर आणि हृतिक या दोघांचेही कोणतेच रोल निश्चित झाले नाही. तर या केवळ चर्चा असल्याचं सागंण्यात येत आहे. दरम्यान ही एक बिग बजेट (Big budget series) असणार आहे. जवळपास 500 कोटींचं बजेट या सीरिजचं असणार आहे.
‘मला लग्न करून 3-4 मुलांची आई व्हायचंय..’; लग्नाबाबत भूमी पेडणेकरने सांगितली फँटसीया सीरिजविषय़ी आणखी विशेष म्हणजे ही सीरिज थ्रीडी मध्ये शुट होणार आहे. तर ही एक लाइव्ह अँक्शन ट्रायलॉजी असणार आहे. ही सीरिज तीन भाषांमध्ये दिसणार आहे. हिंदी, तमिळ, तेलुगू या भाषांमध्ये दिसणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.