जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / कोका कोला तू..! 60 वर्षीय नीना गुप्तांचा हॉट अंदाजात बिनधास्त डान्स, VIDEO होतोय VIRAL

कोका कोला तू..! 60 वर्षीय नीना गुप्तांचा हॉट अंदाजात बिनधास्त डान्स, VIDEO होतोय VIRAL

कोका कोला तू..! 60 वर्षीय नीना गुप्तांचा हॉट अंदाजात बिनधास्त डान्स, VIDEO होतोय VIRAL

डान्स व्हिडीओत नीना बिनधास्त बोल्ड लुकमध्ये डान्स (Neena Gupta Dance video) करत आहेत. 60 वर्षीय नीना या एका पार्टीत हा डान्स करत आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

 मुंबई 22 ऑगस्ट : बॉलिवूडमधील बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्रींमध्ये नीना गुप्ता (Neena Gupta) या अशा अभिनेत्री आहेत ज्यांनी जवळपास सर्व प्रकारचे रोल साकारले आहेत. त्यांच्या कामाची आजही तितकीच वाहवा होते, जेवढी आधी व्हायची. त्यांच्यातील बोल्डनेस अजूनही टिकून आहे. प्रत्येक गोष्ट त्या आत्मविश्वासाने करतात. सध्या त्यांचा एक डान्स व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. या डान्स व्हिडीओत नीना बिनधास्त बोल्ड लुकमध्ये डान्स (Neena Gupta Dance video) करत आहेत. 60 वर्षीय नीना या एका पार्टीत हा डान्स करत आहेत. त्यांचा हा अंदाज पाहून त्यांच्या चाहत्यांनीही त्याचं कौतुक करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता ‘रुप परिवर्तन’ असं कॅप्शनही त्यांनी व्हिडीओला दिलं आहे.

जाहिरात

त्यांचा बिनधास्तपण त्यांच्या वागण्यातून नेहमीच दिसून येतो. काहीच दिवसांपूर्वी त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यात त्यांनी आपण काहीही बोलणार नसून केवळ सुंदर दिसत आहोत म्हणून व्हिडिओ बनवला आहे. असं त्या व्हिडिओत म्हणतात. त्यावर त्यांचे चाहते त्यांना भन्नाट प्रतिक्रिया देताना दिसतात.

नीना या त्यांच्या अभिनयासाठी ओळखल्या जातातच शिवाय त्यांच्या बेधक निर्णयांसाठीही ओळखल्या जातात. मागील काही महिन्यांपासून त्या त्यांच्या पुस्तकामुळे फारच चर्चेत होत्या. ‘सच कहू तो’ (Sach Kahu To) हे पुस्तक काहीच दिवसांपूर्वी प्रकाशित झालं होतं.  त्यात त्यांनी आपल्या जीवनातील अनेक प्रसंग सांगितले आहेत. अनेक चढउतार त्यांनी या पुस्तकात मांडले आहेत. नीना सध्या काही चित्रपट तसेच वेब सीरिज मध्ये काम करताना दिसत आहेत. काहीच दिवसांपूर्वी त्यांचा ओटीटी वरील चित्रपट ‘Dial 100’ प्रदर्शित झाला होता, ज्यात मनोज वाजपेयी (Manoj Bajpai) देखील होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात