Home /News /entertainment /

अभिनेत्रीचे वय लपवण्यासाठी हिरोला करावं लागत असे हे काम, 'रामायण'च्या 'लक्ष्मणा'ने केली बॉलिवूडची पोलखोल

अभिनेत्रीचे वय लपवण्यासाठी हिरोला करावं लागत असे हे काम, 'रामायण'च्या 'लक्ष्मणा'ने केली बॉलिवूडची पोलखोल

सुनील लहरी (Ramayana Laxman aka Sunil Lahri) यांनी इन्स्टाग्रामवर केलेली एक पोस्ट लक्ष वेधून घेणारी आहे. त्यांनी बॉलिवूड संदर्भात एक मजेशीर किस्सा शेअर केला आहे.

  मुंबई, 09 डिसेंबर: रामानंद सागर यांच्या रामायण या मालिकेत लक्ष्मणाची भूमिका (Ramayan Laxman Real Name) साकारणारे सुनील लहरी (Sunil Lahri) सोशल मीडियावरही विशेष चर्चेत असतात. लॉकडाऊन काळात जेव्हा टीव्हीवर जेव्हा पुन्हा एकदा प्रेक्षकांनी रामायणाचा आस्वाद घेतला, तेव्हा या मालिकेतील कलाकार नव्याने प्रेक्षकांमध्ये चर्चेत आले आहे. सोशल मीडियावरही त्यांचे फॉलोअर्स वाढले आहेत आणि या प्लॅटफॉर्म्सवर ते विशेष सक्रीय झाले आहेत. सुनील यांनी देखील इन्स्टाग्रामवर केलेली एक पोस्ट लक्ष वेधून घेणारी आहे. त्यांनी बॉलिवूड संदर्भात एक मजेशीर किस्सा शेअर केला आहे. सुनील यांनी त्यांच्या एका जुन्या सिनेमातील फोटो शेअर केला आहे. ज्यात त्यांना मिशी दिसत आहे. शिवाय अभिनेत्री काजल किरण (Actress Kajal Kiran) देखील या फोटोमध्ये आहेत. त्यांनी कॅप्शन देताना असं म्हटलं आहे की, 'ही एक विचित्र गोष्ट होती की जर तुम्ही एखाद्या जास्त वयाच्या अभिनेत्रीसह अभिनय करताय तर तुम्हाला मिशी लावून जोडी बनवली जात असते. त्या काळातील एक प्रसिद्ध अभिनेत्री काजल किरण यांच्यासह हा एक जुना फोटो..' आजकाल मेकअपमुळे काहीही शक्य आहे. पण त्या काळी वयाचं अंतर कमी दाखवण्यासाठी अशा क्लुप्त्या वापरल्या जात असंत.
  View this post on Instagram

  A post shared by Sunil Lahri (@sunil_lahri)

  सुनील लहरी यांचे वय काजल किरण यांच्यापेक्षा तीन वर्षांनी कमी आहे. काजल किरण यांनी 1977 मध्ये हम किसी से कम नही या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. हे वाचा-मुलगी वामिकाला सोडून अनुष्का-विराट कतरिना-विकीच्या लग्नात सहभागी होणार का? ऐंशीच्या दशकात दूरदर्शनवर प्रसारित झालेलं रामायण लोकप्रियतेच्या शिखरावर होतं. यात अरुण गोविल यांनी साकारलेली प्रभू रामांची आणि दीपिका चिखलिया यांनी साकारलेली सीतेची भूमिका आजही अनेकांच्या लक्षात आहे. लॉकडाऊनमध्ये तर या मालिकेला रेकॉर्ड ब्रेकिंग व्ह्यूज मिळाले.  यानंतर रामायणातील सर्व प्रमुख कलाकार पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published:

  Tags: Ramayan, Television, Television show

  पुढील बातम्या