मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Ramsetu: अक्षय कुमारच्या 'राम सेतू'ला मिळाली बंपर ओपनिंग; पहिल्याच दिवशी केली इतकी कमाई

Ramsetu: अक्षय कुमारच्या 'राम सेतू'ला मिळाली बंपर ओपनिंग; पहिल्याच दिवशी केली इतकी कमाई

रामसेतू

रामसेतू

अक्षय कुमारचा बहुप्रतिक्षित 'राम सेतू' चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. राम सेतू बॉक्स ऑफिसवर पडणार कि भरघोस कमाई करणार याकडे निर्मात्यांचा लक्ष आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 25 ऑक्टोबर : अक्षय कुमार बॉलिवूडचा दमदार अभिनेता आहे. पण काही दिवसांपासून त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणकून आपटत आहेत. अक्षयचे लागोपाठ चित्रपट फ्लॉप झाले. त्याचा 'सम्राट अशोक' सारखा बिग बजेट सिनेमा सुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला नाही. पण आता तो पुन्हा प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याचा बहुप्रतिक्षित 'राम सेतू' चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. हा चित्रपट रामसेतूच्या रहस्यावरून पडदा उठणार आहे. निर्मात्यांना 'राम सेतू'च्या पहिल्या दिवशी बंपर कमाईची अपेक्षा होती, अशा परिस्थितीत निर्मात्यांना दिवाळीच्या मुहूर्तावर एक मोठी भेट मिळणार आहे.

'राम सेतू'ची कथा नास्तिक पुरातत्वशास्त्रज्ञ आर्यन कुलश्रेष्ठ म्हणजेच अक्षय कुमार याच्याभोवती फिरते. पौराणिक राम सेतूचे खरे अस्तित्व सिद्ध करण्याचे काम आर्यनला मिळते. यानंतर, आर्यन 'राम सेतू' च्या पौराणिक कथा आणि विज्ञानाच्या तंत्राने त्याचे सत्य शोधणे सुरू होते. या चित्रपटात अक्षय कुमारसोबत नुसरत भरुचा आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्याही भूमिका आहेत. 'राम सेतू'मध्ये अक्षय कुमार पूर्णपणे वेगळ्या अंदाजात दिसत आहे. अक्षयचा अभिनय आणि चित्रपटाची संकल्पना प्रेक्षकांना खूप आवडते. त्यामुळे राम सेतू बॉक्स ऑफिसवर पडणार कि भरघोस कमाई करणार याकडे निर्मात्यांचा लक्ष आहे.

हेही वाचा - Anushka sharma : दिवाळीच्या सणाला होळीच्या रंगात रंगली अनुष्का - विराटची लेक; वामिकाचे खास फोटो पाहाच

राम सेतू पहिल्या दिवशी कमवू शकतो इतके कोटी

अक्षय कुमारच्या 'राम सेतू'ला सणासुदीच्या काळात आणि दिवाळीच्या सुट्टीत खूप फायदा झाला आहे. हा चित्रपट देशभरात सुमारे तीन हजार स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे. आता समोर येत असलेल्या ताज्या रिपोर्ट्सनुसार, अक्षय कुमार, नुसरत भरूचा आणि जॅकलिन फर्नांडिसचा हा चित्रपट पहिल्या दिवशी म्हणजेच ओपनिंग डेला 15 ते 17 कोटींची कमाई करू शकतो.

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

'राम सेतू'ची अजय देवगणच्या 'थँक गॉड'शी टक्कर

केवळ अक्षय कुमारचा 'राम सेतू'च नाही तर अजय देवगण आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​स्टारर 'थँक गॉड' देखील दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला आहे. अशा परिस्थितीत बॉक्स ऑफिसवर होणाऱ्या या संघर्षाचा परिणाम दोन्ही चित्रपटांच्या कमाईवर होऊ शकतो.

कथा काय आहे

'राम सेतू'ची कथा तेव्हा सुरू होते जेव्हा राजकीय स्वार्थासाठी सरकार रामेश्वरम ते श्रीलंकेपर्यंत भगवान राम आणि त्यांच्या वनारा सेनेने बांधलेला पूल तोडण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करते. एकीकडे सर्वोच्च न्यायालय राम सेतूला नैसर्गिक घटना सांगून तोडू इच्छित असताना, दुसरीकडे तो वाचवायचा आहे. यानंतर, अक्षय कुमार कथेत प्रवेश करतो, जो राम सेतूचे सत्य शोधण्याच्या मिशनवर निघतो.

First published:
top videos

    Tags: Akshay Kumar, Bollywood actor, Bollywood News