मुंबई 1 जुलै: राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) बॉलिवूडमधील एक नामांकित दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. ‘सत्या’, ‘कंपनी’, ‘सरकार’, रंगीला यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांची निर्मिती करणारे राम गोपाल वर्मा गेल्या काही काळात चित्रपटांपेक्षा खासगी आयुष्यामुळे अधिच रर्चेत राहू लागले आहेत. (Ram Gopal Varma Movies) अनेकदा वादग्रस्त वक्तव्यांमुळे त्यांना ट्रोल देखील केलं जातं. असाच काहीसा प्रकार यावेळेसही घडला आहे. त्यांनी फ्रेंडशिप डे दिवशी (Friendship Day 2021) लोकांना शत्रू दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Enemies take ur strengths seriously and friends make u lose ur confidence in those strengths HappyEnemyshipDay
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) August 1, 2021
VIDEO: पंचरत्नांना आठवलं 'बचपन का प्यार'; पाहा कशी धमाल केली 'लिटिल चॅम्पस'च्या परीक्षकांनी
राम गोपाल वर्मा यांनी ‘फेंडशिप डे’च्या शुभेच्छा देण्यासाठी एक ट्विट केलं. मात्र त्यांनी ‘शत्रू दिना’च्या शुभेच्छा देत सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं. “आपले शत्रु आपली ताकद गंभीरतेने घेतात आणि मित्र आपल्या ताकदीवर असलेला आपला विश्वास कमी करतात” अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलं आहे. त्यांचं हे ट्विट सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
लग्नात रितेश पत्नीच्या चक्क 8 वेळा पडला होता पाया; जेनेलियानेच केली पतीची अशी पोलखोल
ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार हा फ्रेंडशिप डे अर्थात मैत्री दिन म्हणून साजरा केला जातो. यंदा हा स्पेशल दिवस आज म्हणजेच 1 ऑगस्ट रोजी आला आहे. या खास दिवशी प्रत्येकजण आपल्या मित्र-मैत्रिणींना, जवळील सहकाऱ्यांना मैत्री दिनाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत. अनेक सेलिब्रिटींनी देखील सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ram gopal varma