मुंबई, 23 जून : आरआरआर फेम साऊथ सुपरस्टार राम चरण आणि पत्नी उपासना हे नुकतेच आई-वडील झाले. उपसाननं एका चिमुकल्या मुलीला जन्म दिला. लग्नाच्या 11वर्षांनी राम आणि उपासना आई-वडील झालेत. दोघांना मुलगी हवी होती आणि लक्ष्मीचा जन्म होताच दोघे अत्यंत आनंदात आहेत. अभिनेते चिरंजीवी देखील नातीच्या येण्यानं खुश आहेत. राम चरणच्या मुलीच्या रुपाने त्यांच्या घरात पहिल्यांदा मुलीचा जन्म झाला आहे. 20 जून रोजी पहाटे उपासनानं मुलीला जन्म दिल्या. त्यानंतर आज 23 जूनला दोन दिवसांनी उपासना आणि तिच्या मुलीला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. हॉस्पिटलमधून बाहेर येताच आई आणि मुलीचं सर्वांकडून दणक्यात स्वागत करण्यात आलं. राम चरण, उपासना आणि त्यांच्या मुलीचा हॉस्पिटल बाहेरचा एक व्हिडीओ समोर आला आहे जो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हैद्राबादच्या अपोलो हिल्स रुग्णालयात राम चरण आणि उपासना यांच्या मुलीचा जन्म झाला. उपासनाची नॉर्मल डिलिव्हरी झाली. डिलिव्हरी दरम्यान कोणतेही अडथळे आले नाहीत असं अपोलो हिल्सच्या डॉक्टरांनी सांगितलं. डिलिव्हरीनंतर उपासना आणि तिची मुलगी दोघीही सुखरूप असल्याचं हॉस्पिटलकडून सांगण्यात आलं होतं. हेही वाचा - Ram Charan-Upasana : भांडता-भांडता प्रेमात पडले; राम आणि उपासनाची फिल्मी Love Story दरम्यान दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर उपासना आणि तिच्या बाळाला हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आलं. राम चरण आणि संपूर्ण कुटुंब चिमुकलीच्या स्वागतासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. त्याचप्रमाणे सुपरस्टारच्या मुलीला शुभेच्छा देण्यासाठी मीडिया आणि चाहत्यांनी अपोलो हिल्स हॉस्पिटलच्या बाहेर मोठी गर्दी केली होती. एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यात राम चरण आणि उपासना मुलीला हॉस्पिटलमधून बाहेर येताच त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. सगळ्यांनी टाळ्या वाजवून चिमुकलीचं स्वागत केलं.
व्हिडीओमध्ये दिसत आहे की राम चरणने चिमुकल्या मुलीला त्याच्या हातात धरलं आहे. हॉस्पिटलबाहेर येताच फुलांचा वर्षाव होताच राम आणि उपसना कमालीचे खुश झाले. राम चरणने पापाराझींसमोर बाप झाल्याचा आनंद व्यक्त केला. आम्ही खुप लकी आहोत. उपासना आणि बाळ दोघांची प्रकृती उत्तम आहे, असं रामचरणने मीडियासमोर सांगितलं.
राम चरण आणि उपासना यांची मुलगी कशी दिसते हे जाणून घेण्यासाठी दोघांचे चाहते उत्साही आहेत. लग्नाच्या 11 वर्षांनी दोघे आई-वडील झाले त्यांचा आनंद गगनात मावत नाहीये. राम चरणने त्याचे सगळे प्रोजेक्ट पूर्ण केले असून तो आता पूर्ण वेळ मुलीसाठी घालवणार आहे.