जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Ram Charan-Upasana : भांडता-भांडता प्रेमात पडले; राम आणि उपासनाची फिल्मी Love Story

Ram Charan-Upasana : भांडता-भांडता प्रेमात पडले; राम आणि उपासनाची फिल्मी Love Story

राम चरण आणि उपासना यांची लव्ह स्टोरी

राम चरण आणि उपासना यांची लव्ह स्टोरी

आज राम चरण आणि उपासना त्यांच्या लग्नाचा 11वा वाढदिवस साजरा करत आहेत. याच निमित्तानं आज रामचरण आणि उपासना यांची लव्ह स्टोरी पाहूयात.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई,  14 जून : साऊथ सुपरस्टार राम चरणची मागील वर्षभर त्याच्या आरआरआर या सिनेमामुळे चांगलीच चर्चा झाली. आपल्या उत्तम अभिनयानं आणि लुक्सनं रामचरणनं प्रेक्षकांची मनं जिंकली. रामचरण आज लाखो प्रेक्षकांचा आवडता अभिनेता आहे. रामचरणचं फिल्मी करिअरमध्ये आज यशाच्या शिखरावर आहे. तसंच त्याचं वैयक्तिक आयुष्य देखील सध्या नवं वळण घेत आहे. रामचरण आणि त्याची पत्नी उपासना कामिनेनी आई - वडील होणार आहेत. लग्नाच्या 10 वर्षांनी त्यांच्या घरी पाळणा हलणार आहे. रामचरण उत्तम अभिनेत्याबरोबर उत्तम बाबाही होईल यात काही शंका नाही. पण त्याआधी तो उत्तम नवराही आहे ही विसरून चालणार नाही. आज दोघे त्यांच्या लग्नाचा 11वा वाढदिवस साजरा करत आहेत. याच निमित्तानं आज रामचरण आणि उपासना यांची लव्ह स्टोरी पाहूयात. राम चरण आणि उपासना यांची लव्ह स्टोरी एखाद्या सिनेमाच्या पटकथेपेक्षा कमी नाहीये. दोघे पहिल्यांदा कॉलेजमध्ये असताना भेटले.  दोघांमध्ये छान मैत्रीला सुरूवात झाली. मैत्री होत असतानाच दोघांमध्ये सुंदर बॉन्डिंग निर्माण झालं. दोघांचे विचार थोडे वेगळे होते त्यामुळे त्या दिवसात काही ना काही कारणामुळे दोघांमध्ये छोटी मोठी भाडणं होत होती. हेही वाचा -  बोल्ड सीन्सची हद्द पार; थिएटरमधून बॅन झाले हे सिनेमे, एकट्यात असताना या OTTवर पाहू शकता कॉलेजमध्ये शिकत असताना दोघांना आपण एकमेकांना आवडत असल्याचा अंदाज आला. कॉलेजची संपूर्ण वर्ष दोघे एकत्र असताना आपलं एकमेकांवर प्रेम असल्याचं दोघांच्या लक्षात आलं नाही. ज्यावेळेस राम चरण त्याच्या पुढच्या शिक्षणासाठी विदेशात जाणार होता तेव्हा दोघांना एमेकांवरील प्रेमाची जाणीव झाली. राम चरण शिक्षणासाठी विदेशात गेले आणि त्यांच्या खऱ्या लव्ह स्टोरीला सुरूवात झाली. एकमेकांपासून लांब गेल्यानंतर दोघांना ही केवळ मैत्री नसून मैत्रीच्या पुढचं नातं असल्याची जाणीव झाली. राम चरण विदेशातून शिक्षण घेऊन पुन्हा भारतात आल्यानंतर उपासनाने तिच्या मनातील भावना त्याला बोलून दाखवल्या. त्यानंतर दोघे एकमेकांना डेट करून लागले. मगधीरा सिनेमाच्या वेळी दोघांच्या अफेअर्सच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. अनेक वर्ष रिलेशनमध्ये राहिल्यानंतर त्यांनी 2011मध्ये साखरपुडा केला. त्यानंतर 2012मध्ये हे कपल लग्नबंधनात अडकलं.

News18लोकमत
News18लोकमत

उपासना आणि राम चरण यांच्या लग्नाला 11 वर्ष पूर्ण झाली आहेत. लग्नाची 11 वर्ष दोघांनी खूप गोडीगुलाबीनं घालवली. आता दोघांच्या आयुष्यात एका तिसऱ्या व्यक्तीची एंट्री होणार आहे. उपासना प्रेग्नंट असून तिने नुकतेच तिचे बेबी बंपसह फोटो शेअर केलेत. जुलै महिन्यात राम चरणच्या घरी चिमुकल्या बाळाचं आगमन होण्याची शक्यता आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात