थिएटरचे दरवाजे बंद झाल्याने अखेर हे सिनेमे ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करावे लागले. कोणते आहेत ते सिनेमे पाहूयात.
अनफ्रिडम नावाचा एक सिनेमावर देखील थिएटरमध्ये बॅन करण्यात आला. काही काळानंतर हा सिनेमा ओटीटीवर रिलीज करण्यात आला.
सिनेमात दोन मुलींमधील समलौंगिक संबंधांवर भाष्य करण्यात आलंय. सिनेमात दोघींवर अनेक बोल्ड सीन्स शुट करण्यात आलेत. हा सिनेमा देखील नेटफ्लिक्सवर पाहायला मिळेल.
लोएव नावाचा एक सिनेमा देखील अत्यंत बोल्ड आहे. सिनेमात समलैंगिक रिलेशनमध्ये असलेल्या दोन मुलांची लव्ह स्टोरी दाखवण्यात आली आहे.
दिग्दर्शक अनुराग कश्यपचा पहिलाच सिनेमा अत्यंत बोल्ड होता. पांच असं सिनेमाचं नाव होतं. 2003मध्ये हा सिनेमा तयार करण्यात आला.
मात्र सिनेमात असलेल्या बोल्ड कंटेन्टमुळे सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होऊ दिला नाही. पांच हा सिनेमा ओटीटीवर पाहू शकता.
गारबेज नावाचा सिनेमा देखील अत्यंत बोल्ड आहे. सिनेमात रामी नावाची एक मुलगी असते जिचा पर्सनल मुमेंट व्हिडीओ लीक होतो.
या सिनेमात त्रिमाला अधिकारी, सतरूपा दास आणि तन्मय धनिया हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. सिनेमा नेटफ्लिक्सवर पाहता येईल.