जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / ज्युनियर एनटीआर - राम चरणच्या 'RRR' चा शहारे आणणारा Trailer ; पाहायला मिळाणार थरार आणि जबरदस्त अॅक्शन

ज्युनियर एनटीआर - राम चरणच्या 'RRR' चा शहारे आणणारा Trailer ; पाहायला मिळाणार थरार आणि जबरदस्त अॅक्शन

ज्युनियर एनटीआर - राम चरणच्या 'RRR' चा शहारे आणणारा Trailer ; पाहायला मिळाणार थरार आणि जबरदस्त अॅक्शन

एस. एस. राजामौली (SS Rajamouli) यांच्या बहुचर्चित मल्टीस्टारर चित्रपट ‘RRR’ चा (RRR Trailer) ट्रेलर व्हिडिओ यूट्यूबवर रिलीज झाला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 9 डिसेंबर -एस. एस. राजामौली (SS Rajamouli) यांच्या बहुचर्चित मल्टीस्टारर चित्रपट ‘RRR’ चा (RRR Trailer) ट्रेलर व्हिडिओ यूट्यूबवर रिलीज झाला आहे. व्हिडिओमध्ये राम चरण (Ram charan) आणि ज्युनियर एनटीआर (Jr NTR) फ्रेंडशिप गोल्स देताना दिसत आहेत. यामध्ये त्यांचा अॅक्शन डोस पाहून अंगावर शहारे येतील. ट्रेलर पाहून चित्रपटाच्या कथेचा अंदाज बांधता येतो की, यात ब्रिटिश राजवटीविरुद्धचा लढा दाखवण्यात आला आहे. त्यात देशभक्तीच्या भावनांचा थरार पाहायला मिळाला. ‘RRR’ च्या ट्रेलर व्हिडिओबद्दल सांगायचे तर, यामध्ये ज्युनियर एनटीआर ब्रिटिश राजवटीविरुद्ध बंड करताना दिसत आहे. त्याचवेळी, राम चरण ब्रिटिश सरकारच्या अधिकृत सैन्यात नोकरीला आहे. पण हे दोन्ही कलाकार एकमेकांचे जवळचे मित्र आहेत. व्हिडिओमध्ये अनेक ठिकाणी ट्विस्ट पाहायला मिळत आहे. एका ठिकाणी, राम चरण ज्युनियर एनटीआर (Ram charan And Jr NTR) ला अटक करताना दिसतो आणि दुसऱ्या दृश्यात तो ब्रिटीश सरकारविरुद्ध बंड करताना दिसतो. यात अनेक ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत. यासोबतच अजय देवगणचा ‘तान्हाजी’ ’ (Tanhaji) वाला लुक आणि अॅक्शनही पाहायला मिळणार आहे. हे सर्व फक्त अद्भुत आहे. चित्रपटाचा ट्रेलर व्हिडिओला अल्पावधीतच दीड लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. वाचा :  विकी कौशलच्या वडिलांचं शाहरूखसोबत आहे खास कनेक्शन; सलमानसोबत कसं आहे नातं? ‘आरआरआर’ चित्रपटात धमाकेदार अॅक्शन पाहायला मिळत आहे. या चित्रपटात राम चरण आणि ज्युनियर एनटीआर व्यतिरिक्त अजय देवगण (Ajay Devgn) आणि आलिया भट्ट(Alia Bhatt) सारखे स्टार्स देखील मुख्य भूमिकेत आहेत.

आरआरआरचे दिग्दर्शन एसएस राजामौली यांनी केले आहे. यापूर्वी त्यांनी ‘बाहुबली’ (Bahubali) सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट आणि त्याचा दुसरा भाग देखील दिला आहे.त्याची कथा लेखक व्ही. विजयेंद प्रसाद यांनी लिहिली असून संगीत तामिळ संगीत दिग्दर्शक एमएम करीम यांनी दिले आहे. हिंदी व्यतिरिक्त, हा चित्रपट 7 जानेवारी 2022 रोजी तामिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात