मुंबई, 11 एप्रिल : सध्या कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जग थांबलं आहे. याचा परिणाम मनोरंजन जगतावरही झाला आहे. सर्वच सेलिब्रेटी लॉकडाऊनमुळे घरी बसले आहेत. मात्र सोशल मीडियाच्या माध्यामातून हे सेलिब्रेटी चाहत्यांशी संवाद साधताना दिसत आहेत. सर्वजण त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहेत. अशात अभिनेत्री राकुल प्रीत सिंह हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतआहे. ज्यात ती भिंतीवर उलटं लटकून टी-शर्ट घालताना दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये राकुल प्रीत सिंह भिंतीवर उलटी लटकून टी-शर्ट घालताना दिसत आहे आणि सर्वांना एन्टरटेन करण्यासोबतच आपली स्ट्रेन्थ सुद्धा दाखवत आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं, सामान्य पद्धतीनं कपडे घालून खूप कंटाळा आला होता. त्यामुळे ही नवी स्टाइल ट्राय करत आहे. हा तुमच्यासाठीही एक टास्क आहे. नक्की ट्राय करा. राकुल प्रीतचा हा व्हिडीओ आतापर्यंत 2 लाख पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे.
या व्हिडीओमध्ये कपडे घालण्याची नवी पद्धत पाहून राकुल प्रीत सिंहचं सर्वजण खूप कौतुक करताना दिसत आहेत. तिच्या या व्हिडीओवर कमेंटचा अक्षरशः पाऊस पडताना दिसत आहे. दरम्यान राकुलनं काही दिवसांपूर्वीच तिचं स्वतःचं यूट्यूब चॅनल सुद्धा सुरु केलं आहे. हे चॅनल तिनं कोरोनाग्रस्तांसाठी फंड गोळा करण्याच्या उद्देशानं सुरू केलं आहे. लग्नाच्या 11 वर्षांनंतर घटस्फोट, दिया मिर्झानं सांगितली नातं तुटण्यामागची कहाणी 25 मुलींच्या ऑडिशननंतर दीपिका झाली रामायणाची सीता, अशी झाली होती निवड असं नक्की काय घडलं की सलमाननं अचानक शेअर केले कब्रस्तानाचे PHOTOS