लग्नाच्या 11 वर्षांनंतर घटस्फोट, दिया मिर्झानं सांगितलं नेमकं कोणत्या कारणानं तुटलं नातं

लग्नाच्या 11 वर्षांनंतर घटस्फोट, दिया मिर्झानं सांगितलं नेमकं कोणत्या कारणानं तुटलं नातं

दिया मिर्झाने तिचा पती साहिल सांगा याच्याशी लग्न केल्यानंतर 11 वर्षांनंतर घटस्फोट घेतला.

  • Share this:

मुंबई, 11 एप्रिल : बॉलिवूडमध्ये ब्रेक अप आणि पॅचअपच्या गोष्टी सातत्यानं कानावर येत असतात. एकदा नातं तुटलं की त्यातून होणारा त्रास आणि बाहेर पडणं खूप जास्त कठीण असतं. ते नातं तुटण्याचं खरं कारण जगासमोर येऊ नये याची काळजी सेलिब्रिटी वेळोवेळी घेत असतात. आपल्या खासगी आयुष्याबद्दल जास्त न बोलणारी बॉलिवूडची स्टार दिया मिर्झाने आपल्या तलाकवर मौन सोडलं आहे. साहिल सांगासोबत तलाक झाल्यानंतर या कठीण काळात स्वत:ला कसं सावरलं आणि त्यांच्यातलं नातं कसं होतं याबद्दल खुलासा केला आहे.

दिया मिर्झाने तिचा पती साहिल सांगा याच्याशी लग्न केल्यानंतर 11 वर्षांनंतर घटस्फोट घेतला. त्याचबरोबर त्यांनी आपल्या इंस्टाग्रामवर एका पोस्टद्वारे घटस्फोटाची घोषणा केली. तिला याबद्दल कोणत्याही प्रकारचे रूमर नको आहे असेही तिने स्पष्ट केले होते. दिया मिर्झाने आपला घटस्फोट झाल्याचं सोशल मीडियावरून सांगितलं होतं. तशी सहजता सर्वांना करणे शक्य नाही. जरी दिया मिर्झाला तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायला आवडत नसलं, तरी नुकत्याच बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत तिने घटस्फोटाविषयी बर्‍याच गोष्टींचे खुलासे केले आहेत.

हे वाचा-25 मुलींच्या ऑडिशननंतर दीपिका झाली रामायणाची सीता, अशी झाली होती निवड

या मुलाखतीत साहिल सांगापासून तलाक घेतल्याचं सांगताना दिया म्हणाली त्यातून होणारा त्रास मला जगासमोर आणायचा नव्हता त्यामुळे त्या वेदनेला लपवण्यासाठी कायमच चेहऱ्यावर हसू असायचं. हो, कदाचित ही माझी जगण्याची कौशल्ये आहेत. जी मी आयुष्यातील अनुभवांमधून शिकले. माझ्याकडे वैयक्तिक वेदनेचा सामना करण्याचे स्वत: चे मार्ग आहेत. मी खूप शिस्तबद्ध जीवनशैली, निरोगी खाणं, योग्य प्रमाणात झोप घेणं, योग ध्यान अगदी सर्व नीट आणि व्यवस्थित करते. या सगळ्या गोष्टीतून मला ऊर्जा आणि आनंद मिळतो.

दिया म्हणते की घटस्फोटानं माझं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं. त्या आधी 'मी भाग्यवान आहे की साहिल आणि माझं एक प्रेमळ, साधं आणि एकमेकांमधलं कॉर्डीनेशन खूप चांगलं होतं. त्यामुळे आम्हाला दोघांनाही बऱ्याच गोष्टी सोप्या झाल्या. दीया आणि साहिल यांनी मिळून प्रोडक्शन बॅनर Born Free Entertainment सुरू केलं होतं. साहिल हे खूप चांगलं सांभाळू शकतो असा विश्वास दीयाने व्यक्त केला आहे.

हे वाचा-लॉकडाऊनमध्ये आपल्या LOVE सोबत नाश्ता करताना दिसला सलमान, पाहा VIDEO

First published: April 11, 2020, 12:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading