• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • फायनली ओम- स्वीटूची प्रेमकहाणी होणार पूर्ण ; आणि मग सिरीयल बंद...?

फायनली ओम- स्वीटूची प्रेमकहाणी होणार पूर्ण ; आणि मग सिरीयल बंद...?

ओम आणि स्वीटू पुन्हा एकत्र येणार असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र हा फायनल टविस्ट सोशल मीडियावर मात्र चांगलाच चर्चेत आला आहे.

 • Share this:
  मुंबई, 22 नोव्हेंबर: झी मराठी वाहिनीवरील 'येऊ कशी तशी मी नांदायला' (yeu kashi tashi mi nandayala) ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील स्वीटू आणि ओमची (om and sweetu) जोडी प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. या दोघांची प्रेमकहाणी देखील प्रेक्षकांना खूप आवडते मात्र आवडली परंतु मध्येच मालिकेत एक असा ट्विस्ट (yeu kashi tashi mi nandayala latest episode )आला त्यामुळे सर्वजण मालिकेचा तिरस्कार करू लागले. आता स्वीटूने कायदेशीररित्या मोहितपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे याच काळात ओम आणि स्वीटू पुन्हा एकत्र येणार असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र हा फायनल टविस्ट सोशल मीडियावर मात्र चांगलाच चर्चेत आला आहे. . सोशल मीडियावर या ट्विस्टनंतर मालिका केव्हा बंद होणार असा प्रश्न केला आहे तरी आम्ही स्वीटू आणि ओमला एकत्र पाहण्याची अतुर आहोत अशा कमेंट केल्या आहेत. झी मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर या मालिकेतील एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये स्वीटू आणि ओम एकमेकांच्या जवळ आल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे येत्या काळात ही जोडी पुन्हा एक होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. वाचा : VIDEO : "स्वराज्य सौदामिनी ताराराणी" मालिकेच्या चित्रीकरणावेळी घोडा अचानक बिथरला आणि काळजाचा ठोका चुकला.... एका नेटकऱ्याने म्हटलं आहे की, पकाऊगिरी👏👏👏2-2 लग्न मस्त स्टोर, तर दुसऱ्याने म्हटलं आहे की, पही मालिका बंद करा, तर आणखी एकाने म्हटलं आहे, आणि मग सिरीयल बंद करणार ना, तर दुसऱ्याने म्हटलं आहे नक्की मालिका केव्हा बंद होणार...असे अनेक प्रश्न या प्रोमो व्हिडीओवर नेटकऱ्यांनी केले आहेत. तर काहींनी हार्ट इमोजी पोस्ट करत फायनली... तो क्षण आला..ज्याची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो अशा देखील कमेंट केल्या आहेत. ओम आणि स्वीटू ला एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत तर मालिका बंद करण्याची मागणी करत आहेत अशीच काहीशी स्थिती सोशल मीडियावर आहे.
  स्वीटूचे लग्न मोहितसोबत झाल्यानंतर या मालिकेला सोशल मीडियावर ट्रोल झाली . प्रेक्षक या लग्नामुळे नाराज झाले होते. त्यांना ओम आणि स्वीटू यांना एकत्र बघायचे आहे. आता फायनली स्वीटूने मोहितपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता मालिकेत ओम आणि स्वीटू एकत्र आल्यानंतर मालिकेचा शेवट होणार की आणखी कोणता नवीन ट्वीस्ट येणार हे येणाऱ्या भागातच समजेल.
  Published by:News18 Trending Desk
  First published: