मुंबई, 20 फेब्रुवारी : राखी सावंत च्या खाजगी आयुष्यातील वाद सध्या चव्हाट्यावर आला आहे. अदिलच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या राखीची अदिलने फसवणूक केली. त्यानंतर तिचे डोळे उघडले. सध्या आदिल तुरुंगात आहे. न्यायालयाने आदिल खानला 20 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. राखी सावंत पती आदिल खानबाबत रोज नवनवीन खुलासे करत आहे. आता पुन्हा एकदा मीडियाशी संवाद साधत तिने एक खुलासा केला आहे. नुकतीच राखी अदिलला तुरुंगात भेटायला गेली होती. तिथे जे घडलं त्याबद्दल राखीने खुलासा केला आहे. आदिल खानबद्दल राखी सावंत काय म्हणाली जाणून घ्या. आदिल खानला अटक झाल्यानंतरही राखी सावंतने त्याच्याबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले. आदिलने तिचे न्यूड व्हिडीओ काढून ते विकले असंही राखी म्हणाली होती. तर आता आदिल पाठोपाठ राखीने त्यांच्या घरच्यांबद्दल संताप व्यक्त केला होता. तिने अदिलाच्या घरच्यांना त्याच्या दुसऱ्या गर्लफ्रेंड विषयी सगळं माहिती असून ते शांत राहिले असा दावा केला होता. तसंच ते सध्या राखीला साथ देत नाहीयेत असं दुःख तिने व्यक्त केलं होतं. आता पुन्हा राखीने त्याच्या घरच्यांवर निशाणा साधला आहे. हेही वाचा - Shiv Thakare: शिव ठाकरेने अखेर सांगूनच टाकलं; लाईव्ह येत आगामी प्लॅन बद्दल केला मोठा खुलासा पापाराझींनी नुकतंच राखी सावंतला आदिलच्या आई-वडील आणि कुटुंबीयांना म्हैसूरहून फोन किंवा मेसेज आला होता का? असं विचारलं. यावर राखी सावंत म्हणाली की, ‘त्यांना चांगलंच माहित आहे की त्यांच्या मुलगा आदिल कसा माणूस आहे. त्यांना वाटत कि तो सहज सुटेल. पण मी राखी सावंत आहे. मी शांत बसणार नाही.’
राखी सावंतने पुढे सांगितले की, तिने आदिलची तुरुंगात भेट घेतली आहे. यावेळी ती म्हणाली कि, मी त्याच्याकडे दीड कोटी मागितले. त्याने एक कोटी 60 लाख रुपये ठेवले कुठे? हे मी त्याला विचारले. यावर त्याने माझ्यासोबत उद्धटपणे बातचित केली आहे. म्हणतोय मी तुला कधीच माफ करणार नाही. मी पोलिसांना जाब द्यायचा की तुला.’ अशी उत्तरं आदिल तिला देत आहे.
राखी सावंतने जुलै 2022 मध्ये आदिल खानशी लग्न केल्याचा दावा केला होता. त्यानंतर सात महिन्यांनंतर दोघेही मीडियासमोर आले की त्यांनी मागच्या वर्षी आदिलसोबत लग्न केले होते आणि लग्नानंतर तिने फातिमा असे नाव बदलत धर्मांतर केले. पण लग्नाच्या घोषणेनंतर काही दिवसांतच दोघांमधील वादाच्या बातम्या समोर येऊ लागल्या. राखी सावंतने यापूर्वी आदिलवर मारहाणीचा आरोप केला होता. त्याच्यावर पैशांची अफरातफर केल्याचा आरोपही होता. यानंतर पोलिसांनी ७ फेब्रुवारीला आदिल खानला अटक केली. आदिल खानची पोलिस कोठडी २० फेब्रुवारीला संपत आहे. आता आदिलला कोर्टाकडून दिलासा मिळतो की नाही हे पाहावं लागेल.