गेल्या काही दिवसांपासून राखी आईचं आजारपण, निधन आणि पतीकडून फसवणूक अशा अनेक गोष्टींना सामोरं जात आहे.
राखी सावंतने पती आदिल खान दुर्रानीवर फसवणूक आणि कौटुंबिक हिंसाचारसारखे गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर तो सध्या तुरुंगात आहे.
2019 मध्ये राखीने एनआरआय उद्योगपती रितेशशी लग्न केल्याचा खुलासा केला होता. पण काही काळातच राखी आणि रितेशचे ब्रेकअप झाले.
2009 मध्ये, राखीने टीव्ही शो 'राखी का स्वयंवर' द्वारे एनआरआय एलेश पारुजनवालासोबत लग्न केले. पण काही महिन्यांनंतर, मतभेदांमुळे दोघे वेगळे झाले. राखीने सांगितले की, पैशासाठी तिने एलेशशी लग्न केले.
राखी सावंत कोरिओग्राफर अभिषेक अवस्थीसोबत तीन वर्षे रिलेशनशिपमध्ये होती. तिने त्याच्यासोबत नच बलिए या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता. पण नंतर दोघेही वेगळे झाले.