मुंबई 26 मे : निरनिराळ्या कारणांसाठी सतत चर्चेत राहणारी ड्रामा क्वीन अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) पुन्हा एकदा ट्रोल झाली आहे. गेले काही दिवस राखी सतत चर्चेत राहत आहे. कधी ती भाजी आणायला घराबाहेर पडते, कधी सामान घ्यायला तर कधी कॉफी पिण्यासाठी. यावेळी तिने परिधान केलेल्या हटके कपड्यांमुळे ती ट्रोल होत आहे. नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा राखी कॉफी पिण्यासाठी घराबाहेर पडली होती. यावेळी काही मीडियाशी तिने संबाद साधला. पण तिने तिची हटके फॅशन पाहून तिथे उपस्थित काही लोकांनी तिला प्रश्न विचारले.
प्रिया बापटच्या सौंदर्याला लागले चार चाँद; पाहा अभिनेत्रीच्या दिलखेच अदाराखीने टॉर्न जिन्स परिधान केली होती. पण तीला इतके कट्स होते की पाहणारे ही चकीत झाले व त्यांनी विचारलं, “हे हाताने फाडले आहेत का?” यावर राखीने आपल्या नेहमीच्या शैलित उत्तर देत “हो, हाताने फाडले आहेत. माझ्याकडे कपडे नाहीत फाडून फाडून घालत आहे”, असं म्हणाली. यावर सगळेच हसू लागले.
राखी नेहमी मुंबईतील एका ठिकाणी कॉफी पिण्यासाठी येत असते. तेव्हा तीला काही मीडिया स्पॉट करतो. राखी त्यांच्याशी संवादही साधते. मागे एकदा राखी भाजी खरेदी करण्यासाठी पीपीई कीट घालून आली होती. व सगळ्यांनीच पीपीई कीट घालून बाहेर पडाव असं ती म्हणाली होती. त्यामुळे राखी कधी काय करेन याचा काही नेम नाही.
याशिवाय त्या कॉफी शॉप मधून बाहेर पडताना राखीने काही संवाद ही साधला त्यावेळी तिला नुकत्याच झालेल्या युविका चौधरी (Yuvika Choudhari) वरील विवादावर प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा राखी म्हणाली, “युविका फार चांगली मुली आहे. तिने जर अनावधानाने काही म्हटलं असेल तर माफी मागावी व मागीतली असेल तर जनता तिला नक्कीच माफ करेन. प्रिन्स माझा चांगला मित्र आहे.”