जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Mrs Chatterjee Vs Norway Trailer: काळजाला भिडणारी आईच्या संघर्षाची कथा; राणी मुखर्जीचा अभिनय आणतोय अंगावर शहारा

Mrs Chatterjee Vs Norway Trailer: काळजाला भिडणारी आईच्या संघर्षाची कथा; राणी मुखर्जीचा अभिनय आणतोय अंगावर शहारा

मिसेस चॅटर्जी Vs नॉर्वे ट्रेलर रिलीज

मिसेस चॅटर्जी Vs नॉर्वे ट्रेलर रिलीज

राणी मुखर्जी लवकरच मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. तिच्या आगामी चित्रपटाचा दमदार ट्रेलर नुकताच रिलीज झाला असून पहिल्या लूकमध्येच राणीच्या भूमिकेचं कौतुक होत आहे,

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 23 फेब्रुवारी: बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. अनेक वर्ष विविधांगी भूमिका साकारत राणी मुखर्जीने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ती जी भूमिका साकारते त्यात जीव ओतते.  ‘हीचकी’, ‘मर्दानी’ या चित्रपटातील राणीच्या भूमिका विशेष गाजल्या आहेत. आता यानंतर राणी मुखर्जी लवकरच मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. तिच्या आगामी चित्रपटाचा दमदार ट्रेलर नुकताच रिलीज झाला असून पहिल्या लूकमध्येच राणीच्या भूमिकेचं कौतुक होत आहे. राणी मुखर्जीच्या ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ या चित्रपटाची चाहत्यांना खूप दिवसांपासून प्रतीक्षा होती आणि आता त्याचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटात राणी मुखर्जी एका बंगाली महिलेची भूमिका साकारत असून ती मुलांसाठी लढताना दिसणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर तर धमाकेदार आहेच पण राणी मुखर्जीने आपल्या अभिनयाने नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा आश्चर्यचकित केले आहे. हेही वाचा - Ranbir Kapoor: ‘या’ मोठ्या क्रिकेटरच्या भूमिकेत दिसणार रणबीर कपूर; सिनेमाच्या शूटिंगला लवकरच सुरुवात ट्रेलरच्या सुरुवातीला मिसेस चॅटर्जी म्हणजेच राणी मुखर्जी आपल्या दोन मुलांसह नॉर्वेमध्ये राहत असल्याचे दाखवण्यात आले आहे. नॉर्वेमध्ये कुटुंबासह नवीन सुरुवात करण्यासाठी ती आपला देश सोडते. तिचे दोन्ही मुलांवर खूप प्रेम आहे. अचानक एके दिवशी मिसेस चॅटर्जी यांना कळते की नॉर्वेच्या सरकारने त्यांची दोन्ही मुलं त्यांच्यापासून हिरावून घेतली आहेत. सरकारने त्यासाठी श्रीमती चॅटर्जी आपल्या मुलांची योग्य काळजी घेऊ शकत नाहीत असं कारण सांगितलेलं आहे. चॅटर्जी आपल्या मुलांना स्वतःच्या हाताने खाऊ घालतात. त्यांच्यासोबत एकाच पलंगावर झोपतात आणि वाईट नजर लागू नये म्हणून काळा टिकाही लावतात. पण नॉर्वे सरकारला हे सर्व आपल्या नियमांच्या विरुद्ध वाटते. आणि इथेच राणीच्या भूमिकेचा संघर्ष सुरु होतो.

जाहिरात

मिसेस चॅटर्जी म्हणजेच राणी मुखर्जी आपल्या मुलांना परत आणण्यासाठी नॉर्वे सरकारशी लढते आणि कोर्टात पोहोचते. ट्रेलरमध्ये एका ठिकाणी राणी मुखर्जीचा दमदार संवादही प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’च्या ट्रेलरमध्ये राणी मुखर्जीने तिच्या दमदार अभिनयाची झलक दाखवली आहे.

News18लोकमत
News18लोकमत

राणी मुखर्जी 2019 मध्ये ‘मर्दानी 2’ आणि 2021 मध्ये ‘बंटी और बबली 2’ मध्ये दिसली होती. तेव्हापासून चाहते तिच्या पुढच्या चित्रपटाची आतुरतेनं वाट पाहत होते. ‘मिसेस चॅटर्जी विरुद्ध नॉर्वे’ हा चित्रपट एका सत्य घटनेने प्रेरित असल्याचे म्हटले जाते. आता या चित्रपटाचा ट्रेलर पाहून  चाहते अभिनेत्रीचं तोंडभरून कौतुक करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात