मुंबई, 29 जानेवारी : राखी सावंतची आई कॅन्सरशी झुंज देत होती. पण अखेर शनिवारी 28 जानेवारी रोजी प्रदीर्घ आजाराने रुग्णालयात निधन झाले. काल रात्री 8 वाजून 32 मिनिटांनी जुहू येथील सिटीकेअर रुग्णालयात राखीच्या आईने अखेरचा श्वास घेतला. राखीने याविषयीची माहिती दिली. अखेरच्या क्षणांमध्ये राखी आईसोबतच होती. या महिन्याच्या सुरुवातीला राखीने आईला ब्रेन ट्यूमर झाल्याचे सांगितले होते. तसेच जया यांची प्रकृती गंभीर असल्याचंही ती म्हणाली होती. आता अखेर राखीच्या आईवर अंतिम संस्कार पार पडले आहेत.
आईच्या अखेरच्या दिवसांमध्ये राखी तिच्याबरोबर होती. पण त्यांच्या निधनानंतर राखीची अवस्था खूपच बिकट झाली आहे. सोशल मीडियावर राखी सावंतचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात राखी सावंत आईचं पार्थिव रुग्णालयातून नेताना ढसाढसा रडताना दिसत आहे. तसेच राखीच्या या बिकट क्षणांमध्ये तिला आदिल खानची देखील साथ मिळत आहे.
हेही वाचा - ज्युनियर एनटीआरच्या भावाची प्रकृती चिंताजनक; हृदयविकाराच्या झटक्याने अभिनेता कोमात
राखी सावंत सध्या वाईट काळातून जात आहे. जुहू येथील क्रिटी केअर रुग्णालयात उपचारादरम्यान त्याच्या आईचा मृत्यू झाला. राखी सावंतची काळजी घेण्यासाठी तिचा पती आदिल दुर्रानीही आला होता. एका व्हिडिओमध्ये तो पत्नीचा हात धरताना दिसत होता. राखी सावंतचा भाऊ राकेशही सकाळपासूनच हॉस्पिटलमध्ये दिसला. मृतदेह रुग्णालयातून स्मशानभूमीत नेण्यात आला.
View this post on Instagram
आईच्या जाण्याने राखी सावंत पूर्णपणे कोसळली आहे. तिला स्वतःवर नियंत्रण ठेवता येत नाही. आईचा मृतदेह पाहून ती नुसती रडत असते. पती आदिलने तिची काळजी घेतली. पण आई गेल्यामुळे तिला स्वत:ला सांभाळता येत नाही.
राखी सावंतल धीर देण्यासाठोई सिनेजगतातील अनेक कलाकार पोहचले होते. बिग बॉस फेम अभिनेत्री रश्मी देसाई, तसेच बॉलिवूडची प्रसिद्ध दिग्दर्शिका फराह खान देखील राखीच्या आईच्या अंत्यविधी दरम्यान उपस्थित होत्या. अभिनेत्रीला मिठी मारून राखी रडू लागली. यावेळी तिचे सर्व मित्र, नातेवाईक आणि प्रसारमाध्यमांनी तिच्या आईच्या अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती. येथे राखी सावंत सतत रडताना दिसली. यासोबतच ती आईच्या अंत्यसंस्काराची तयारी करतानाही दिसली होती.
राखी सावंतच्या आईला ब्रेन ट्युमर होता. तिची आई काही वर्षांपासून आजारी होती. राखी 'बिग बॉस मराठी सीझन 4' मधून बाहेर पडताच तिला तिच्या आईबद्दल माहिती मिळाली. मुकेश अंबानी आईच्या उपचारात मदत करत असल्याचंही राखी सावंतने म्हटलं होतं. नुकतेच मुंबईत आंबोली पोलिसांनी राखीला ताब्यात घेतले होते. महिला मॉडेलच्या तक्रारीनंतर पोलिसांनी राखीची चौकशी केली. दिवसभर चौकशी केल्यानंतर सोडण्यात आले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Rakhi sawant