मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /ज्युनियर एनटीआरच्या भावाची प्रकृती चिंताजनक; हृदयविकाराच्या झटक्याने अभिनेता कोमात

ज्युनियर एनटीआरच्या भावाची प्रकृती चिंताजनक; हृदयविकाराच्या झटक्याने अभिनेता कोमात

ज्युनियर एनटीआर

ज्युनियर एनटीआर

ज्युनियर एनटीआर हे नाव सध्या भारतभर गाजत आहे. सध्या त्याचा 'RRR' हा चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत आहे. पण सध्या त्याच्या कुटुंबातून एक चिंताजनक बातमी समोर येत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 29 जानेवारी : ज्युनियर एनटीआर हे नाव सध्या भारतभर गाजत आहे. सध्या त्याचा 'RRR' हा चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत आहे. पण सध्या त्याच्या कुटुंबातून एक चिंताजनक बातमी समोर येत आहे. नंदामुरी कुटुंबातील सदस्य, ज्युनियर एनटीआर यांचे चुलत भाऊ आणि अभिनेता नंदामुरी तारका रत्न यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. अलीकडेच एका पदयात्रेदरम्यान अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका आला. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तारकरत्न यांचे आरोग्य अपडेट समोर आले आहे. ते कोमात गेले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

अभिनेत्याला रुग्णालयात भेटण्यासाठी पाहुणे आणि चाहत्यांनी गर्दी केली होती. नंदामुरी कुटुंबातील अनेक सदस्य रुग्णालयात आहेत, तर अनेक राजकारणी देखील अभिनेत्याच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आले होते. त्याच वेळी, सोशल मीडियावर, चाहते सतत अभिनेत्याच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देत आहेत. तो ट्विटरवर ट्रेंड करत आहे.

हेही वाचा - Hemangi Kavi: 'धर्मामुळे त्याचा द्वेष करणारे....' बॉलिवूडच्या 'पठाण' बद्दल हेमांगी कवीची 'ती' पोस्ट चर्चेत

तारकरत्न यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी कुटुंबीय आणि नातेवाईक बंगळुरू येथील नारायण हृदयालय रुग्णालयात पोहोचले आहेत. ज्युनियर एनटीआर आणि कल्याण राम यांचे कुटुंबीयही रुग्णालयात पोहोचले. दरम्यान, तारकरत्न यांचे चुलत भाऊ नंदामुरी चैतन्य कृष्णा यांनी अभिनेत्याच्या प्रकृतीची माहिती माध्यमांना दिली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तारक रत्न यांची प्रकृती अजूनही गंभीर आहे. तो कोमात आहे. डॉक्टरांनी सोमवारी हेल्थ अपडेट देण्यास सांगितले आहे.

नंदामुरी तारक रत्न 'RRR' अभिनेता ज्युनियर एनटीआर आणि कल्याण राम यांचे चुलत भाऊ आहेत. ते अभिनेते आणि आंध्र प्रदेश (युनायटेड) चे तीन वेळा मुख्यमंत्री नंदामुरी तारका रामाराव यांचे नातू आहेत. ते नंदामुरी बालकृष्ण आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री नारा चंद्राबाबू नायडू यांचे पुतणे आहेत.

नुकतेच तारका रत्न त्याचा चुलत भाऊ नारा लोकेशसोबत एका रॅलीत पोहोचला होता. येथील पदयात्रेदरम्यान ते अचानक बेशुद्ध पडले. गर्दीमुळे त्याचा श्वास गुदमरल्याचे सांगण्यात आले. यानंतर, जेव्हा त्यांना रुग्णालयात नेण्यात आले तेव्हा डॉक्टरांनी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका आला असल्याचे सांगितले आहे.ते लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी चाहते देवाकडे प्रार्थना करत आहेत.

First published:

Tags: Entertainment, South indian actor