जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Javelin throw च्या नादात राखी सावंतने फोडलं एकाचं डोकं; मुंबईच्या रस्त्यावरच करत होती सराव

Javelin throw च्या नादात राखी सावंतने फोडलं एकाचं डोकं; मुंबईच्या रस्त्यावरच करत होती सराव

Javelin throw च्या नादात राखी सावंतने फोडलं एकाचं डोकं; मुंबईच्या रस्त्यावरच करत होती सराव

टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) भालाफेकपटू नीरज चोप्राच्या (Neeraj chopra) विजयानंतर राखी सावंतला (Rakhi sawant) लागलं भालाफेकीचं वेड.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    मुंबई, 09 ऑगस्ट : नुकत्याच झालेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) भारताचा भालाफेकपटू (Javelin Throw) नीरज चोप्रा (Neeraj Chopra) याने सुवर्णपदक (Gold Medal) पटकावलं. त्यामुळे त्याच्यावर कौतुकाचा, अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अनेक सेलिब्रिटीदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून नीरजचं कौतुक करत आहेत. यात अभिनेत्री राखी सावंतदेखील (Actress Rakhi Sawant) मागे नाही.  नीरजच्या विजयानंतर तर राखी सावंतलाही भालाफेकचं वेड लागलं आणि रस्त्यावरच सराव करताना दिसली. या नादात तिने एकाचं डोकंही फोडलं. राखी सावंत तिच्या विचित्र व्हिडिओमुळे कायम चर्चेत असते. सध्या राखीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत असून, त्यात ती भालाफेकीचा सराव करताना दिसते आहे. पण तिच्या हातात भाला नाही तर दांडा आहे. मुंबईच्या रस्त्यावरच राखी हातात दांडा घेऊन उतरली.

    जाहिरात

    नीरजची कॉपी करत राखी मुंबईच्या (Mumbai) रस्त्यावर एक काठी घेऊन भालाफेकीची प्रॅक्टिस करताना दिसत आहे.  राखीने काठी फेकल्यानंतर तिचा नेम चुकला आहे. समोरून  ‘हे काय चाललं आहे’ असा आवाज येतो आहे. राखीने फेकलेली ही काठी एका व्यक्तीच्या डोक्यावर जाऊन बसली. राखीने भालाफेक सरावाच्या नादात एकाचं डोकं फोडलं. म्हणजे तसं त्या व्यक्तीला फार लागलं असं नाही तर हा एक मजेशीर व्हिडीओ आहे. राखी यात  ‘मी प्रयत्न तर केला,’ असं उत्तर देतानाही दिसते आहे. काठी फेकल्यानंतर ती स्वतःचंच कौतुक करते. हे वाचा -  अखेर झाला खुलासा! तैमूरनंतर मुघल बादशहावरुन ठेवलं करिनाने दुसऱ्या बाळाचं नाव कधी एखाद्या शोमुळे तर कधी सोशल मीडियातील व्हिडिओ किंवा कॉमेंट्समुळे राखी सावंत कायमच चर्चेत असते. बिग बॉस 14 नंतर कोणत्या ना कोणत्या कारणाने ती कायम चर्चेत आहे. सध्या तिचं आणि फोटोग्राफर्स (Photographers) मंडळींचं विशेष पटत असल्याचं दिसून येत आहे. राखी जीममध्ये जाऊ दे किंवा फळं-भाजीपाला खरेदीसाठी घराबाहेर पडू दे, तिच्याभोवती फोटोग्राफर्स मंडळींचा गराडा पाहायला मिळतो. अशा वेळी राखी अशी काही विचित्र कृती करते, की त्यामुळे फोटोग्राफर्स, तसंच आजूबाजूच्या लोकांचंही चांगलंच मनोरंजन होतं. हे वाचा -  VIDEO : अभिनेत्री मोनालिसाच्या त्रासाला वैतागला नवरा विक्रांत; चाकू घेतला आणि… यात ती भालाफेकीची  प्रॅक्टिस करताना दिसत आहे. तिची ही प्रॅक्टिस पाहून कोणालाही हसू आवरणार नाही.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात