Home /News /entertainment /

अभिनेत्री मोनालिसाच्या त्रासाला वैतागला नवरा विक्रांत; चाकू घेतला आणि... VIDEO VIRAL

अभिनेत्री मोनालिसाच्या त्रासाला वैतागला नवरा विक्रांत; चाकू घेतला आणि... VIDEO VIRAL

भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा (Monalisa) आणि तिचा नवरा विक्रांत सिंह राजपूतचा (Vikrant singh rajput) हा व्हिडीओ व्हायरल होतो आहे.

नवी दिल्ली, 09 ऑगस्ट : भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा (Bhojpuri Actress Monalisa) आणि तिचा पती विक्रांत सिंह राजपूत (Vikrant Singh Rajput) ही इंडस्ट्रीतली लोकप्रिय जोडी आहे. हे स्टार कपल एकमेकांना गोल्स देतं. हे कपल सोशल मीडियावर (Social Media) खूप अॅक्टिव्ह असतं. आपल्या खासगी आयुष्यातले अनेक अपडेट्स हे दोघंही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्ससोबत शेअर करत असतात. तसंच व्हिडिओच्या माध्यमातून ते आपल्या फॅन्सचं भरपूर मनोरंजनदेखील करतात. नुकताच विक्रांत याने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून (Instagram Account) पत्नी मोनालिसासोबतचा एक फनी व्हिडिओ (Funny Video) शेअर केला आहे. हा व्हिडिओ त्यांच्या फॅन्सना खूप आवडला असून, तो व्हायरल होत आहे. विक्रांतसिंह राजपूतने इन्स्टाग्रामवरून जो व्हिडिओ शेअर केला आहे, त्यात विक्रांत आणि मोनासिला हे दोघं परेश रावल (Paresh Rawal) आणि जॉनी लिव्हर (Johnny Lever) यांच्या डायलॉग्जवर लिप-सिंक करताना दिसत आहेत.
जॉनी लिव्हर यांचा 'छोटा छतरी' हा डायलॉग विक्रांत म्हणत असताना दिसत आहे, त्यावर परेश रावल यांचा कन्फ्युजिंग डायलॉग मोनालिसा म्हणत असल्याचं या व्हिडिओत दिसत आहे. हे वाचा - 'हो मी वेगळा आहे'; Bigg boss फेम अभिनव शुक्लाने उलगडलं आपलं मोठं गुपित शेवटी विक्रांत मोनालिसाच्या बोलण्यामुळे खूप वैतागतो आणि चिडून त्याचा चेहरा लालबुंद होतो. चिडलेला विक्रांत शेवटी चाकू काढतो. चाकू पाहूनही मोनालिसाचा दंगा कमी होत नाही. या दोघांचा हा व्हिडिओ खूपच मजेदार झाला आहे. हा व्हिडिओ फॅन्सना खूपच आवडला असून सोशल मीडियावर तो व्हायरल होत आहे. मोनालिसा आणि विक्रातसिंह राजपूत हे दोघेही भोजपुरी चित्रपटसृष्टीतले सुपरस्टार (Superstar) आहेत. या दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे; मात्र गेल्या काही काळापासून ते भोजपुरी चित्रपटसृष्टीपासून दूर असून, हिंदी टीव्ही सीरियल्समध्ये (TV Serials) काम करत आहेत. हे वाचा - वादग्रस्त व्हिडीओ आला अंगाशी; Bigg Boss अभिनेत्रीला पोलिसांनी केली अटक मोनालिसा लवकरच धब्बा या आगामी वेबसीरिजमध्ये (Web series) एका वैशिष्ट्यपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. या वेबसीरिजमध्ये मोनालिसासोबत अनेक टीव्ही स्टारही झळकणार आहेत. मोनालिसाची ही पहिली वेबसीरिज आहे. विक्रांत सध्या विद्या या टीव्ही सीरियलमध्ये भूमिका करत आहे. निरहुआ यांच्या बॉर्डर या भोजपुरी चित्रपटात विक्रांत यापूर्वी शेवटचा दिसला होता. तो चित्रपटहिट झाला होता. या चित्रपटात निरहुआ आणि प्रवेश लाल यादव यांसारखे स्टार्स मुख्य भूमिकेत होते.
First published:

Tags: Actress, Entertainment, Funny video, Instagram post, Viral, Viral videos

पुढील बातम्या