Home /News /entertainment /

अखेर झाला खुलासा! तैमूरनंतर मुघल बादशहावरुन ठेवलं करिनाने दुसऱ्या बाळाचं नाव

अखेर झाला खुलासा! तैमूरनंतर मुघल बादशहावरुन ठेवलं करिनाने दुसऱ्या बाळाचं नाव

करिना-सैफचा पहिल्या मुलाच्या नावावरुन मोठा वाद झाला होता.

  मुंबई, 9 ऑगस्ट : 20 डिसेंबर 2016 रोजी करिना कपूर खान (Kareena Kapoor Khan) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) यांच्या घरात पहिल्यांदा पाळणा हलला होता. सैफीनाने बाळाचं नाव तैमूर अली खान (Taimur Ali Khan) ठेवलं होतं. ज्यानंतर देशभरात खूप वाद झाला होता. सैफ करिना दुसऱ्यांदा आई-बाबा झाले आहे. आता दुसऱ्या बाळाचं नावही समोर आलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून करिना दुसऱ्या बाळाचं नाव काय ठेवणार याबद्दल चर्चा सुरू होती. अखेर दुसऱ्या बाळाचं नाव समोर आलं आहे. जहांगिर आहे बाळाचं नाव सैफ-करिनाच्या दुसऱ्या बाळाचं नाव जेह आहे. सोमवारी मात्र तैमूर अली खान याच्या छोट्या भावाच्या पूर्ण नावाची मोठी चर्चा सुरू होती. करिना कपूरचं गर्भारपणातलं पुस्तक समोर आल्यानंतर ही चर्चा अधिक वाढली. बॉलिवूड हंगामाच्या एका रिपोर्टनुसार करिनाच्या नव्या पुस्तकात छोट्या बाळाच्या फोटोच्या खाली जहांगिर लिहिलं आहे. त्यामुळे करिना-सैफच्या दुसऱ्या बाळाचं संपूर्ण नाव जहांगिर खान असल्याचं सांगितलं जात आहे. याबाबत अद्याप करिना-सैफ यांच्याकडून अधिकृत माहिती आलेली नाही. (After Timur Kareena kapoor khan named her second child after the Mughal emperor) हे ही वाचा-हे' आहेत बॉलिवूडचे बहूप्रतिक्षित चित्रपट; शेकडो कोटींचं आहे बजेट
  घराचं नाव आहे जेह मीडिया रिपोर्टनुसार ज्या प्रकारे तैमूर अली खान याच्या घराचं नाव टिमटिम आहे. त्या प्रकारे जहांगिरच्या घराचं नाव जेह असल्याचं सांगितलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुगल बादशहा अकबर यांचा मुलगा नूर-उद-दीन मोहम्मद सलीम याचं नाव जहांगिर होतं. जहांगिर एक पारशी शब्द आहे. याचा अर्थ संपूर्ण जगाचा राजा असा आहे. हिंदुस्तानने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
  जेहचा फोटो आणि नाव करिना आणि सैफने अद्याप दुसऱ्या बाळाच्या नावाची घोषणा केलेली नाही. दुसरीकडे करिना जे फोटो सोशल मीडियावर शेअर करते त्यात दुसऱ्या बाळाचा फोटो झाकलेला ठेवण्यात आला आहे.
  Published by:Meenal Gangurde
  First published:

  Tags: Bollywood actress, Kareena Kapoor, Kareena kapoor baby

  पुढील बातम्या